महानगरपालिका पोटनियमांच्या मसुद्याला मान्यता

14th September 2017, 03:43 Hrs

प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर मागील १५ वर्षांत पोटनियम तयार करण्यात आलेले नाही. नगरपालिका पोटनियमानुसार महानगरपालिकेचा कारभार चालविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या प्रथमच तयार करण्यात आलेल्या सहा पोटनियमांच्या मसुद्याला बुधवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
निवृत्त जिल्हाधिकारी एन.डी. अगरवाल यांनी महानगरपालिका पोटनियमांचा मसुदा तयार केला आहे. महानगरपालिकेचे पोटनियम नसल्याने कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. पोटनियमांचे मसुदे नगरविकास कार्यालयामार्फत मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत, असे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या खुल्या मार्केटमधील विक्रेत्यांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेली जागा मशीनच्या साहाय्याने तोडून त्याठिकाणी एका फळ विक्रेत्याने पक्का गाडा उभारण्याचा प्रयत्न केला आहे. या फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला आहे. रविवारी रात्रीच्या वेळी मशीनच्या साहाय्याने विक्रेत्यांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेला सिमेंट सोफा मशीनच्या साहाय्याने तोडण्यात येत असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला आढळून आले. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त, तसेच महापौर सुरेंद्र फुर्तादो, मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांना देण्यात आली. या फळ विक्रेत्यांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या विक्रेत्याच्या विरोधात पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल करावी, असेही ठरविण्यात आले आहे. महापौर फुर्तादो यांनी नवे महानगरपालिका आयुक्त अजित रॉय (आयएएस) यांचे स्वागत केले.
मान्यता देण्यात आलेले सहा पोटनियम
घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), पदपथावरील विक्रेते (उदरनिर्वाह संवर्धन व नियमन), महापालिका (कामकाज), महानगरपालिका भरती व सेवा शर्ती, महानगरपालिका व्यापार व अधिवास परवाना, महानगरपालिका (वाहतूक नियंत्रण) या पोटनियमांना मान्यता देण्यात आली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांचे सहकार्य आवश्यक आहे.
- अजित रॉय,
आयुक्त, महानगरपालिका

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more