Update
   कोलवाळ येथे टाटा अेस गाडीला आग, ९० हजारांचे नुकसान   बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

मोरजी येथील पांडुरंग पुरखे यांच्यावर खुनी हल्ला

12th September 2017, 03:21 Hrs

प्रतिनिधी
गोवन वार्ता
पेडणे : कान्नायिक‍वाडा, मोरजी येथील पांडुरंग पुरखे यांच्यावर ११ रोजी रात्री तेम्बवाडा क्रीडा मैदानाजवळ खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. गंभीर अवस्थेत त्यांना बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग राजाराम पुरखे जेवल्यानंतर नियमित फिरायला जातात. शिरोडकर वाडा ते फुटबाल मैदानपर्यंत चालून आल्यानंतर मागच्या बाजूने दोघे धावून आले आणि कोयत्याने त्यांच्यावर खुनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, आजूबाजूला कोणीही नसल्याने जखमी अवस्थेतच ते घरी आले. त्यांना सुरुवातीला शिवोली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्यांना जिल्हा हॉस्पिटल म्हापसा येथे पाठवले. तिथे प्राथमिक उपचार करून गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. पांडुरंग राजाराम पुरखे हे सुतारकाम करतात. रात्री जेवल्यानंतर ते नियमित फिरायला जातात. आजही ते रात्री दहानंतर फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. पेडणे पोलिस घटनास्थळी जाऊन काही पुरावे मिळतात काय याचा रात्रीपर्यंत तपास घेत होते.

Related news

बेपत्ता शालेय विद्यार्थ्याचा शोध अद्याप जारी

ठवीच्या वर्गात शिक्षणारा अंकित हा मुलगा Read more

बेकायदा रेती उत्खननावर कारवाई

सुमारे १ हजार क्युबिक मिटर रेती जप्त Read more

Top News

काणकोणात पाणी टंचाईची शक्यता

यंदा ८३ इंच पावसामुळे चापोली धरण जलाशयाची पातळी कमी Read more

दप्तरासंबंधी​ वास्कोत लवकरच बैठक

मुरगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती : परिपत्रकाची माहिती देणार Read more

पुरावे नसल्याने अधिकारी दोषमुक्त

चावडी रुबी रेसिडन्सी प्रकरण Read more

योगीराज कामत आज एसआयटीसमोर

प्रकृती अस्वाथ्यामुळे दिगंबर कामत चौकशीसाठी गैरहजर Read more