Update
   सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात व्यत्यय, दीपक गडेकर याला २ महिने कैद   गोवा राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीवर तिघा सदस्यांची नियुक्ती   पश्चिम बंगालच्या नागरिकाकडून कळंगुट येथे ३० हजाराचा गांजा जप्त   रावणफोंड येथे बारमालकावर बिअर बाटल्यांनी हल्ला, हॉस्पिसियोत दाखल

वेगवेगळ्या अपघातांत एक ठार, पाच जखमी

नावेलीत बसमधून पडून विद्यार्थिनी, तर सिरसई येथे तिघे दुचाकीस्वार जखमी

12th September 2017, 04:20 Hrs

प्रतिनिधी
गोवन वार्ता
मडगाव : राज्यात सोमवारी वेगवेगळ्या ‌ठिकाणी अपघात होऊन एक ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातात मडगाव, धर्मापूर येथे प्रवासी बसच्या खाली चिरडून दुचाकी चालक जागीच ठार झाला. यात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. नावेलीत बसमधून पडून एक विद्यार्थिनी, तर सिरसई येथील अपघातात तिघे जखमी झाले.
मडगाव, धर्मापूर येथील लिटल फ्लॉवर जवळ भरधाव वेगाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना धडक बसून विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी बसच्या खाली चिरडून भीषण अपघातात शाहनवाज आख्तर (३५) हा दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेली त्याची पत्नी शायना आख्तर (२८) ही गंभीर जखमी झाली. ही अपघाताची घटना सोमवारी सकाळी ९ वा. झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहनवाज आख्तर हे मूळचे बेळगावचे असून मडगाव येथे व्यापारी धंदा करीत होते. तसेच वेळ्ळी येथे त्यांचे वास्तव्य होते. सोमवारी सकाळी वेळ्ळीहून आपल्या पल्सर दुचाकी (जीए ०६-सी-३४०१)ने भरधाव वेगाने मडगावच्या दिशेने येत होते. धर्मापूर येथील लिटल फ्लॉवर जवळ पोहचताच त्याच दिशेने समोरून जाणाऱ्या एका वाहनाला त्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या दुचाकीची धडक त्या वाहनाला मागून बसल्याने शाहनवाज विरुद्ध दिशेने फेकला गेला. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या प्रवासी बस (जीए ०९-यू-१३६७)च्या मागच्या चाकाखाली चिरडला गेल्याने तो जागीच ठार झाला. दुचाकीवर मागे बसलेली त्याची पत्नी शायना ही रस्त्यावर फेकली गेल्याने गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले.
मडगाव शहर पोलिस ठाण्याचे हवालदार गणपती नाईक यांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह हॉस्पिसियोत पाठविले. शवचिकित्सेनंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयाच्या स्वाधीन करण्यात आले. या भीषण अपघात प्रकरणी उपनिरीक्षक हरिष नाईक पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, नावेली येथील ओडिसी निवासी संकुला जवळ चालत्या बस‍मधून पडून मौरिन गिल्बर्ट फर्नांडिस (१६) ही उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जखमी झाली. नंतर उपचारासाठी तिला हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौरीन फर्नांडिस ही कोलवा येथील विद्यार्थिनी नावेलीतील रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयातून सुटल्यानंतर काणकोणहून मडगावला येणारी मिनी बस (जीए ०८-टी-४६९५) मधून जात असता‍ गतिरोधकावर बसने उसळी घेतली. यावेळी दरवाजाजवळ असलेली मौरीन बसचा दरवाजा उघडल्यामुळे रस्त्यावर फेकली गेली. यात तिच्या डोक्याला व हातांना जबर मार लागला आहे. हॉस्पिसियोत तिच्यावर उपचार चालू आहेत. या अपघात प्रकरणी शहर पोलिसांनी बस चालक इरफान शेख याच्याविरूद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, म्हापसा, सिरसई येथे पेट्रोलपंप जवळ दोन मोटारसायकलची आमने सामने धडक बसून झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सोमवारी सायं. ४.३० च्या सुमारास घडला. सीडी डॉन दुचाकीवरून महेंद्र गोवेकर (४६, अस्नोडा) हा अस्नोडाहून म्हापशाच्या बाजूने येत होता. त्याच्या दुचाकीसमोरून जाणारी कार अपघात स्थळाजवळ डाव्या बाजूने वळली असता. महेंद्रचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या स्पलेंडर दुुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार नामदेव वायंगणकर (६२) व हर्षा साळगावकर (४५) रस्त्यावर कोसळले. या अपघातात तिघेही दुचाकीस्वार जखमी झाले. जखमींना येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. गंभीर जखमी नामदेव वायंगणकर यांना पुढील उपचारार्थ गोमेकॉमध्ये पाठविण्यात आले. तर जखमी हर्षा साळगांवकर यांच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू असून किरकोळ जखमी महेंद्र गोवेकर यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

Related news

लॉरेन्स फुर्तादो यांचे निधन

: राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातील प्रोजेक्टनिस्ट-कॅमेरा ऑपरेटर लॉरेन्स फुर्तादो यांचे गुरुवारी (दि. ३१) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले. फुर्तादो दि. ३१ ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्त होणार होते. Read more

अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी

अमली पदार्थ विरोधी पथकाने खोर्ली-म्हापसा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी छापा टाकून १६ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला होता. Read more

अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकाला २ वर्षांचा सक्षम कारावास

अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नायजेरियन नागरिकाला २ वर्षांचा सक्षम कारावास आणि ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. Read more

Top News

कॅशलेस : पोलिसांना द्यावा लागेल जबाब

कॅसिनोंतील जागृतीसाठीच्या उपाययोजनाही कराव्या लागणार स्पष्ट : कृती अहवाल पाठविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुरुवारपर्यंतची मुदत Read more

राज्य सहकारी बँकेवर आजपासून प्रशासक

 त्रिसदस्यीय मंडळाची नेमणूक : संचालक मंडळाचा राज्य सरकारवर असहकार्याचा ठपका Read more

बाबल कवळेकरांच्या आजच्या जबाबाकडे राज्याचे लक्ष

अटकपूर्व जामीन अर्जावरही आजच सुनावणी Read more