Update
   सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात व्यत्यय, दीपक गडेकर याला २ महिने कैद   गोवा राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीवर तिघा सदस्यांची नियुक्ती   पश्चिम बंगालच्या नागरिकाकडून कळंगुट येथे ३० हजाराचा गांजा जप्त   रावणफोंड येथे बारमालकावर बिअर बाटल्यांनी हल्ला, हॉस्पिसियोत दाखल

अँडरसनचे कसोटीत ५०० बळी पूर्ण

09th September 2017, 05:53 Hrs
लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने एक नवा कीर्तिमान आपल्या नावावर केला. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तो ५०० गडी बाद करणारा जगातील सहावा खेळाडू बनला तर इंग्लंडतर्फे ५०० गडी बाद करणारा पहिला गोलंदाज बनण्याचा मान त्याला मिळाला.
त्याने लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाचा सलामीवीर क्रेग ब्रेथवेटला त्रिफळाचीत करत हा कीर्तिमान गाठला. यानंतर त्याचे खेळाडूंसह प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गडगडाटात कौतुक केले. ५०० गड्यांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर तो थोडा भावूक झाला होता.
आता अँडरसनपेक्षा पुढे मुथय्या मुरलीधरन (८८ बळी), शेन वार्न (७०८ बळी), अनिल कुंबळे (६१९ बळी), ग्लेन मॅकग्राथ (५६३ बळी आणि कर्टनी वॉल्श (५१९ बळी) यांचा क्रमांक आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५०० बळी प्रथम मिळवण्याचा पराक्रम कर्टनी वॉल्शने केला होता. याच लॉर्ड्सच्या मैदाना ग्लेन मॅकग्राथने आपले ५०० बळी पूर्ण केले होते.
२००३ साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अँडरसनने आपला ५००वा गडी १२९व्या कसोटीत बाद केला होता. २०१५ साली आपला शंभरावा कसोटी सामना खेळताना त्याने इंग्लंडचा त्यावेळचा सर्वांत यशस्वी गोलंदाज सर इयान बॉथमचा विक्रम मोडला होता. सर बॉथम यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३८३ गडी बाद केले आहेत. अँडरसन एकदिवसीयमध्येही सर्वांत यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर २६९ एकदिवसीय बळी आहेत.
----
सामने : १२९
डाव : २४२
चेंडू : २८२३४
धावा : १३८४६
बळी : ५०३
५ बळी : २३ वेळा
१० बळी : ३ वेळा

Top News

कॅशलेस : पोलिसांना द्यावा लागेल जबाब

कॅसिनोंतील जागृतीसाठीच्या उपाययोजनाही कराव्या लागणार स्पष्ट : कृती अहवाल पाठविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुरुवारपर्यंतची मुदत Read more

राज्य सहकारी बँकेवर आजपासून प्रशासक

 त्रिसदस्यीय मंडळाची नेमणूक : संचालक मंडळाचा राज्य सरकारवर असहकार्याचा ठपका Read more

बाबल कवळेकरांच्या आजच्या जबाबाकडे राज्याचे लक्ष

अटकपूर्व जामीन अर्जावरही आजच सुनावणी Read more