राफेल नदाल अंतिम फेरीत

यूएस ओपन २०१७ : उपांत्य फेरीत डेल पोत्रोचा ४-६, ६-०, ६-३, ६-२ ने पराभव

09th September 2017, 05:41 Hrs
न्यूयॉर्क : स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदाल तिसरा अमेरिकन ओपन किताब आणि १६व्या ग्रँड स्लॅमपासून एक पाऊल दूर आहे. यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यात त्याने युआन मार्टिन डेल पोत्रोचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
न्यूयॉर्कमध्ये २०१० आणि २०१३ साली किताब जिंकणाऱ्या ३१ वर्षीय नदालने डेल पोत्रोचा उपांत्य फेरीत ४-६, ६-०, ६-३, ६-२ने पराभव केला. आता नदाल आपल्या कारकीर्दीतील २३व्या आणि या वर्षात तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. या वर्षी त्याने विक्रमी १०वा फ्रेंच ओपन किताब आपल्या नावावर केला आहे.
रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरील या खेळाडूचा सामना ३२व्या क्रमांकावरील केविन अँडरसनशी होणार. ग्रँड स्लॅमच्या ५२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने स्थान मिळवले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत ४ सेटमध्ये टेनिसचा बादशाह रॉजर फेडररचा पराभव करणारा २००९चा चॅम्पियन डेल पोत्रो उपांत्य फेरीतील सामन्यात खूपच दमलेला दिसून येत होता. त्याने पहिला सेट जिंकला मात्र यानंतर तो खूपच दमलेला दिसून आला व नदालची ताकद आणि चपळता याचे त्याच्याकडे उत्तर नव्हते. नदालने या सामननयात ४५ विनर्स लगावले आणि २० सहज चुका केल्या तर डेल पोत्रो केवळ २३ विनर्स लगाऊ शकला व त्याने ४० सहज चुका केल्या.

दुसऱ्या एका उपांत्य फेरीच्या सामन्यात अँडरसनने स्पेनच्या १२व्या क्रमांकावरील पाब्लो करेनो बुस्ताचा ५-६, ७-५, ६-३, ६-४ने पराभव करत पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत नदालला प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याने अँडरसन​विरुद्ध झालेल्या चारही सामन्यात विजय मिळवलेला आहे. मात्र स्पेनच्या या दिग्गज खेळाडूने हा सामना सहज घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दुहेरीत जीन - होरिया अजिंक्य
नेदरलँडच्या जीन ज्युलियन रॉजर आणि रोमानियाच्या होरिया तेकाऊने अमेरिकन ओपनच्या पुरुषांच्या दुहेरीचा किताब आपल्या नावावर केला. या १२व्या क्रमांकावरील जोडीने फेलिसियानो लोपेज आणि मार्क लोपेज या स्पेनच्या ११व्या क्रमांकावरील डिचा ६-४, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्यांदाच अमेरिकन ओपन किताब आपल्या नावावर केला.

Related news

ऐतिहासिक चार दिवसीय कसोटी दोन दिवसात आटोपली

एकमेव सामन्यात दक्षिण आफ्रिकेनडून झिंबाब्वेचा डावाने पराभव Read more

अॅलिस्टर कुकचे नाबाद द्विशतक

चौथ्या अॅशेस कसोटी मालिकेत इंग्लंड मजबूत Read more

गोव्याच्या महिला संघाला जेतेपद

वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा : बंगालला ३७ धावांनी नमवले Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more