Update
   सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात व्यत्यय, दीपक गडेकर याला २ महिने कैद   गोवा राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीवर तिघा सदस्यांची नियुक्ती   पश्चिम बंगालच्या नागरिकाकडून कळंगुट येथे ३० हजाराचा गांजा जप्त   रावणफोंड येथे बारमालकावर बिअर बाटल्यांनी हल्ला, हॉस्पिसियोत दाखल

अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकाला २ वर्षांचा सक्षम कारावास

अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नायजेरियन नागरिकाला २ वर्षांचा सक्षम कारावास आणि ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

30th September 2017, 04:01 Hrs
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नायजेरियन नागरिकाला २ वर्षांचा सक्षम कारावास आणि ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात हणजुणे पोलिसांनी १७ फेब्रुवारी २०१४ रोजी दुपारी २.३० ते ५.३० च्या दरम्यान गुप्तचरांच्या माहिती नुसार प्राईसवाडो-हणजुणे येथील सेंट अँथोनी चॅपेलजवळ चिडी ओकोन्क्वो ((२८) या नायजेरियन नागरिकांकडून पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीचे ४.९० ग्रॅम कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ओकोन्क्वो याच्या विरोधात अमलीपदार्थ विरोधी कायदा १९८५च्या कलम २१ (ब) नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी अोकोन्क्वो याच्याकडून अमली पदार्थासह दोन मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली होती.या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शिंदे यांनी तक्रार दाखल करुन तपास केला. तर पोलिस उपनिरीक्षक महेश केरकर यांनी १० डिसेंबर २०१४ रोजी म्हापसा येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. ओकोन्क्वो सध्या कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात आहे.
संशयिताला नाहक या प्रकरणात पोलिसांनी गुंतविल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांतर्फे करण्यात आला. या प्रकरणी सरकारतर्फे अॅड. अनुराधा तळवलीकर तर बचावपक्षातर्फे अॅड. एस. पाल्हा यांनी युक्तिवाद केला.

Related news

लॉरेन्स फुर्तादो यांचे निधन

: राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातील प्रोजेक्टनिस्ट-कॅमेरा ऑपरेटर लॉरेन्स फुर्तादो यांचे गुरुवारी (दि. ३१) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले. फुर्तादो दि. ३१ ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्त होणार होते. Read more

अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी

अमली पदार्थ विरोधी पथकाने खोर्ली-म्हापसा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी छापा टाकून १६ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला होता. Read more

Top News

कॅशलेस : पोलिसांना द्यावा लागेल जबाब

कॅसिनोंतील जागृतीसाठीच्या उपाययोजनाही कराव्या लागणार स्पष्ट : कृती अहवाल पाठविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुरुवारपर्यंतची मुदत Read more

राज्य सहकारी बँकेवर आजपासून प्रशासक

 त्रिसदस्यीय मंडळाची नेमणूक : संचालक मंडळाचा राज्य सरकारवर असहकार्याचा ठपका Read more

बाबल कवळेकरांच्या आजच्या जबाबाकडे राज्याचे लक्ष

अटकपूर्व जामीन अर्जावरही आजच सुनावणी Read more