तनिषा - अदितीला दुबईत सुवर्ण

16th September 2019, 09:55 Hrs

पणजी :गोव्याच्या तनिषा क्रास्तोने तिची जोडीदार अदिती भटसोबत मिळून दुबई कनिष्ठ आंतरराष्ट्रीय सीरिज २०१९मध्ये अजिंक्यपद पटकावले. भारताच्या या कनिष्ठ खेळाडूंनी विजय मिळवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
अग्रमानांकीत जोडी तनिषा - अदितीने द्वितीय मानांकन प्राप्त ट्रिसा जॉली आणि वर्षिनी श्री या जोडीचा २१-१७, २१-१७ने पराभव करत विजेतेपद प्राप्त केले. गोवा - उत्तराखंड ही जोडी यावर्षी शानदार प्रदर्शन करत आहे व एकापाठाेपाठ एक असे पदके पटकावत आहे. या विजयामुळे या जोडीचा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिप २०१९साठी प्रवेश निश्चित झाला आहे.
दरम्यान भारतासाठी तसनीम मीरने मुलींच्या एकेरीत तर मिश्र दुहेरीत अयान राशिद व मीर यांनी सुर्व पटकावले.

Top News

कर्नाटकचे मंजुरीपत्र; नियोजित डावाचा संशय

म्हादई : वन, वन्यजीव परवान्यासाठी कर्नाटकची सल्लागार नियुक्ती निविदा Read more