मुसळधार पावसामुळे चिंबल परिसरातील घरांची हानी

मुसळधार पावसामुळे चिंबल


12th July 2019, 06:26 pm



परिसरातील घरांची हानी
जुने गोवा : गुरूवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिंबल परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. याचा सर्वाधिक फटका अवर लेडी ऑफ लिवरा चॅपेल परिसराताला बसला. झरिना डायस यांच्या घरासमोरील रस्त्यावर पाणी साचून ते थेट घरात घुसले तसेच जवळच्या गौरी नाईक यांच्या दुकानातही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. कदंब पठार रस्त्याला जोडणारा चॅपेलजवळचा रस्ता वाहून गेल्याने भूमिगत वाहिन्यांही उघड्या पडल्या. रस्त्यावर दगड, माती, चिखल पसरल्याने वाहतूकही बंद पडली होती.
पठारावरील साई मंदिराकडील पाणी चिंबल गावात उतरत असल्यामुळे तसेच गटारावर झाकणे टाकण्यात आल्याने पाणी साचत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. उभ्या राहिलेल्या नव्या बांधकामांमुळे पाणी दुसरीकडे वाहात न जाता, चिंबलमध्ये उतरते, असेही ग्रामस्थ म्हणतात.
दरम्यान, आंब्याचे झाड पडल्याने गुरुवारी पहाटे कार्लुस परेरा यांच्या घराची हानी झाली. त्यांच्या स्वयंपाकघर व स्वच्छतागृहाची हानी झाली. सुदैवाने कार्लुस यांची पत्नी व मुलगा बचावला. अग्निशमन दलाची गाडी येऊन काही तांत्रिक कारणामुळे लगेच परत गेल्याने पडलेले झाड रात्रीपर्यंत त्याच अवस्थेत होते