कुशावती नदीवरील पूल पाण्याखाली

मडगाव-केपे रस्त्यावर पाणी आल्याने चादरमार्गे वळवली वाहतूक


12th July 2019, 06:25 pm



प्रतिनीधी। गोवन वार्ता
केपे :
राज्यात सध्या सुरू झालेल्या मुळधार पावसामुळे पाराडो केपे येथील कुशावती नदीवरील पूल पाण्याखाली गेला अाहे. तसेच मडगाव ते केपे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गातील सर्व वाहतूक तिळामळ ते चादरमार्गे वळवावी लागली तर काही वाहने आमोणा ते चादर या मार्गाने पाठवण्यात आली.
बुधवार सायंकाळपासून केपे, सांगे तालुुक्यात मुसळधार पावसाला सुुरुवात झाली. त्यामुळे केपे तालुक्यातील कुशावती नदी भरून वाहू लागली आहे. बुधवारी रात्री पाण्याची पातळी वाढल्याने पारोडा केपेे येथील पारोडा ते अवडे-कोठंबी या गावांना जाेडणाऱ्या कुशावती नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. मडगाव-केपे ये मुख्य रस्तासुद्धा पारोडा येथे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक गुरुवारी सकाळी वाहतूक ठप्प झाली होती​. यामुळे दररोज सांगे, सावर्डे केपे भागातून दररोज कामाला जाणाऱ्या लोकांना वळसा घेऊन तिळामळ मार्गे मडगावला जावे लागले. सर्व प्रवासी बस व इतर सर्व वाहने चादरमार्गे वळवल्याने या भागातून येणाऱ्या लोकांना मडगाव येथे कामावर पोहोचण्यास बराच उशीर झाला.
कुशावती पूल पाण्याखाली गेल्याने अवडे कोठंबी या भागातील लोकांसुद्धा गैरसोयीचा सामना करावा लागला. कुशावती नदीच्या काठावर असलेल्या कुळागार व शेतजमिनीत पाणी भरले असून परिसर जलमय झाला आहे. बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून केपे, गुडी पारोडा येथे पोलिस तैनात करण्यात आले होते.
दरवर्षी पावसाळ्यात मडगाव रस्ता व कुशावती नदीवरील पूल दोन ते तीन वेळा पाण्याखाली जाण्याचे प्रकार होतात. यामुळे लोकांची गैरसोय होती. यावर उपाययोजना करण्याबाबत सरकारकडे मागणी केली जाते; मात्र सरकारने याबाबत अद्याप काेणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे लोकांत नाराजी आहे.
फोटो : 1
१) पाण्याखाली गेले पारोडा येथील कुशावती नदीवरील पूल. २) मडगाव केपे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने चादरमार्ग वळवलेली वाहतूक.
-----
प्रतिनिधी। गाेवन वार्ता
केपे :
बुधवारपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे केपे भागातील अनेक ठिकाणी पडझड होऊन मोठे मोठ्याप्रमाणात हानी झाली.
अनेक ठिकाणी घरावर झाडे पडली तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे व वीज खांब काेसळल्याने काही ठिकाणी रस्त्यावरून वाहने टप्प होण्याचे प्रकार केपे परिसरात घडले. यामुळे वीज कमर्चारी व अग्निशामक दलाचे कर्मचारी दिवसभर व्यस्त होते. केपे येथील दैवसा ते इगामळ या मुख्य रस्त्यावर वीज खांब पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याच रस्त्यावर एक काजुचे झाड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच या भागात अन्य ठिकाणी २ वीज खांब कोसळले आहेत. अवडे पारोडा येथील इमॅक्युलेट कॉन्सेपशन हायस्कुलची संरक्षक भिंत कोसऴली आहे. तसेच असोल्डा येथे मोठे झाड वीजतारांवर कांसळल्याने येथील रस्ता बंद झाला होता