किर्तीवंत


22nd June 2019, 11:57 am
किर्तीवंत

प्रयोगक्षम विज्ञानाचा जनक
-
प्रयोगक्षम विज्ञानाचा जनक गॅलिलिओ यांचा जन्म इटली देशातील पिसा या शहरामध्ये १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. आपल्या मनगटावरील नाडीचे ठोके दर मिनिटाला ८० असे पडतात. त्याचाच उपयोग करून त्याने झुंबराच्या आंदोलनाचा वेळ माेजून पाहिला व गतीचे नियम शोधून काढले. हा शोध त्याने वयाच्या १७ व्या वर्षी लावला. त्यामुळे पिसा विद्यापीठात त्याला गणित शिक्षकाची नोकरी मिळाली.
गॅलिलिओने २४ तासात त्या कालातील दुर्बिणीपेक्षा तिप्पट शक्तिशाली दुर्बिण तयार केली. पुढे त्याच दुर्बिणीतून समुद्रावरील बोटी न्याहाळता न्याहाळता आकाशातील ग्रह व त्यांचे उपग्रह, चंद्र शोधून काढले. चर्च विरुद्ध बोलणाऱ्यांचा त्यासाठी बराच छळ होई. त्यामुळे त्यांच्या आधुनिक मतांबद्दल त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. निराश वातावरणात दि. ८ जानेवारी १६४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर ३४० वर्षांनी ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हा गॅलिलिओचा विचार पोप पॉल दुसरे यांनी मान्य केला.
- अरुण रा. कोटगी, बेनाडीकर
खडपाबांध