मुरगाव नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे भवितव्य आज ठरणार

अविश्वास ठरावावर होणार मतदान; विरोधकांकडे अधिक संख्याबळ

13th June 2019, 02:25 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : मुरगावचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर आणि उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्याविरुद्ध विरोधी गटाने पुन्हा दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी गुरुवार दि. १३ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मुरगाव पालिका मंडळाचे खास बैठक बोलावली आहे. हा ठराव संमत होणार की पुन्हा काही तांत्रिक कारणास्तव तो फेटाळण्यात येईल, याची उत्सुकता लागून राहिलेली आहे.
मुरगाव पालिका मंडळाच्या २५ सदस्यांपैकी विरोधी गटाकडे १३ सदस्य आहेत. त्यामुळे अविश्वास ठराव संमत होणार यात शंका नाही. मात्र, ३ मे रोजी झालेल्या अविश्वास ठरावाप्रसंगी जे तांत्रिक कारण पुढे करण्यात आले ते पाहता अविश्वास ठरावावरील मतदानावेळी काहीही घडू शकते, अशी चर्चा आहे. मागच्या वेळी १३ जणांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले होते; मात्र एका मतपत्रिकेवर मार्करऐवजी साध्या पेनचा वापर करण्यात आल्याने प्रकरण नगरविकास मंत्र्यांसमोर गेले. नगरविकास मंत्र्यांनी अविश्वास ठराव संमत झाला नसल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे विरोधी गटाने पुन्हा अविश्वास ठराव दाखल केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न फोल
गावकर व परब यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले होते; परंतु विरोधी गटाने काही अटी ठेवल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न फोल ठरला. अविश्वास ठराव आणण्यामागील कारण म्हणजे मुरगाव पालिकेमध्ये भ्रष्टाचार वाढला असल्याचे विरोधी गटाने सांगितले आहे, तर दुसरीकडे आपल्या कार्यकाळात विकासकामांना गती मिळाली आहे. विरोधी गटाला विकासकामे नको असल्याचा दावा क्रितेश गावकर यांनी केला आहे.

भाजप विरुद्ध भाजप
मुरगाव पालिका मंडळातील सत्ताधारी गटाला नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांचा, तर विरोधी गटाला वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही लढत भाजप विरुद्ध भाजप अशीच आहे. मध्यंतरी विरोधी गटातील १२ पैकी दोघांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तो प्रयत्न सत्ताधारी गटावरच उलटला होता. सत्ताधारी गटाचे संदेश मेस्ता विरोधी गटाकडे वळले गेले. त्यामुळे सत्ताधारी गटाचे संख्याबळ तेरावरून बारा झाले आहे.

बहुमतासाठी तेरा सदस्यांची गरज आहे. विरोधी गटातील सर्वजण एकसंध आहेत. गटातील सर्व सदस्यांवर पूर्ण विश्वास असल्याने त्यांना कोठेही लपवून ठेवलेले नाही.
- दीपक नाईक, नगरसेवक, मुरगाव.   

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more