भाजपला मिळणार नवीन प्रदेशाध्यक्ष

विनय तेंडुलकर यांची माहिती; संघटनात्मक निवडणुका लवकरच

12th June 2019, 03:11 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : भाजपच्या संघटनात्मक निवडणुका लवकरच होणार आहेत. पुढील दोन महिन्यात प्रदेश भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली. प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचीच या पदासाठी निवड होते, असेही तेंडुलकर म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ संपला आहे. दोन वेळा प्रदेशाध्यक्षपद भूषविल्यानंतर तिसऱ्यांदा त्याच व्यक्तीला हे पद मिळत नाही. यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड होईल, असे तेंडुलकर म्हणाले. गुरुवारी दिल्लीत भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तथा संघटनमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीबाबतचा निर्णय होईल. प्रारंभी सदस्यता नोंदणी मोहीम होईल. त्यानंतर बुथस्तरीय समिती, मंडळ समिती, जिल्हा समिती आणि प्रदेश समितीची निवड होणार आहे. सर्वांत शेवटी भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड होईल, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

पार्सेकरांबाबत सोपटेंना विचारा
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पोटनिवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले काय, असा सवाल केला असता, त्याबाबत दयानंद सोपटे यांनाच विचारा, असा टोला विनय तेंडफॅलकर यांनी हाणला. आपल्याला पार्सेकरांविषयी काहीच वक्तव्य करायचे नाही. त्यांची या पदासाठी निवड होईल की नाही, हे आपण काहीच सांगू शकत नाही. पक्षासोबत राहून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केलेल्यांची या पदासाठी निवड केली जाईल, असेही तेंडुलकर म्हणाले.  

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more