निर्माल्य फेकणाऱ्याला मुख्यमंत्र्यांकडून समज

गवंडाळी पुलावरील घटना


12th June 2019, 02:08 am


प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : निर्माल्याची पिशवी गवंडाळी पुलावरून खाली पाण्यात टाकण्याच्या बेतात असलेल्या एका नागरिकाला मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समज दिली. स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
मंगळवारी मुख्यमंत्री डाॅ. सावंत साखळीहून गवंडाळी पुलमार्गे पणजीकडे येत असताना त्यांच्या वाहनापुढे एक दुचाकीचालक निर्माल्याची पिशवी पाण्यात टाकण्याच्या बेतात होता. मागाहून येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे चित्र पाहिल्यानंतर लगेच आपले वाहन थांबवले आणि त्याला समज दिली. स्वच्छतेच्याबाबतीत प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. समुद्रात किंवा नदीमध्ये कचरा टाकणे अयोग्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपला परिसर आणि राज्य स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नाग​रिकाची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.