मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण

Story: विशेष प्रतिनिधी-गोवनवार्ता | 07th June 2019, 02:36 Hrs


पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याकडील अनेक खाती सहकारी मंत्र्यांना वितरित केली असून, ज्येष्ठ मंत्री मॉविन गुदिन्हो यांना महत्त्वाचे वाहतूक खाते बहाल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांना वन खाते मिळाले असले तरी गोवा फॉरवर्डचे अन्य मंत्री जयेश साळगावकर यांची वस्तूसंग्रहालय खाते देऊन बोळवण करण्यात आली आहे तर जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांना अतिरिक्त कोणतेही खाते देण्यात आलेले नाही.
डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतला त्यावेळी मनोहर पर्रीकर यांच्याकडे असलेली सर्व खाती तशीच कायम ठेवली होती. आपल्याकडील काही महत्त्वपूर्ण खाती अन्य मंत्र्यांना दिली जातील, याचे संकेत त्यांनी त्यावेळी दिले होते. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या पारड्यात कायदा तसेच उद्योग ही जड खाती पडली आहेत. अपक्ष आमदार गोविंद गावडे यांना सहकार खाते देण्यात आले आहे. वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांना नदी परिवहन खात्यासह प्रोव्हेदोरिया देण्यात आली आहे.
एखाद्या मोठ्या खात्याची मागणी व अपेक्षा असलेल्या जयेश साळगावकर यांच्या झोळीत केवळ वस्तू संग्रहालय खात्याची भर पडली आहे. मगोला सोडचिठ्ठी देऊन आलेले आणि सार्वजनिक बांधकाम खाते पटकावलेले मंत्री दीपक पाऊस्कर यांना हस्तकला खाते तर बाबू आजगावकर यांना राजभाषा, सार्वजनिक गाऱ्हाणी खाती देण्यात आली आहे. अपक्ष आमदार तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांना नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन खाते देण्यात आले आहे.           

Related news

बदलती जीवनशैली हेच आत्महत्येचे मूळ : तेंडुलकर

व्यक्त न होण्याच्या स्वभावामुळे पुरुषांमध्ये नैराश्येचे प्रमाण अधिक Read more

पोडवाळ येथील बंधारा दुरुस्तीचे आश्वासन

कृषी अधिकाऱ्यांकडून भगदाडाची पाहणी; खारे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान Read more

बस तिकीट दरात वाढ!

पहिल्या तीन किलोमीटरला १० रुपये, शटलसाठी १.४० रुपये प्रती किमी Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more

अवैध रेती, चिरे खाणी; खाण खाते लक्ष्य

इतर खात्यांच्या असहकार्याचा फटका; प्रभावी तोडगा काढण्यासाठी उचलली पावले Read more

चिरे खाणींच्या खंदकांवर सुरक्षात्मक उपाय करा

खाण खात्याचा आदेश; २० ऑक्टोबरपर्यंत मुदत Read more