न्यूझीलंडचा शनिवारी श्रीलंकेशी सामना

31st May 2019, 02:00 Hrs

कार्डिफ : गतवर्षीचा उपविजेता संघ न्यूझीलंड आयसीसी विश्वचषकात आपल्या अभियानाची सुरुवात खराब फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी करणार आहे. सहा वेळा उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड २०१५ साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. अंतिम फेरीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते.
यानंतर ब्रँडन मॅक्यूलमच्या स्थानावर केन विलियम्सनकडे संघाची सूत्रे सोपवण्यात आली मात्र २०१५ सालातील संघात मोठे बदल झाले नाहीत. मागच्या विश्वचषकानंतर न्यूझीलंड जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताला नमवले होते तर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले होते.
न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी खेळाडू रॉस टेलर शानदार फॉर्ममध्ये आहे व मागच्या वर्षी त्याने ९० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. दुसरीकडे विलियम्सन व मार्टिन गप्टिलही खतरनाक फलंदाज आहेत. गोलंदाजीवर लक्ष टाकल्यास ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम व टीम साउथीवर जलदगती गोलंदाजीचा दारोमदार राहणार आहे. फिरकीची जबाबदारी ईश सोढी व मिशेल सेंटनरवर असणार आहे
न्यूझीलंडचे पारडे १९९६ सालचा चॅम्पियन मात्र सध्या नवव्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेच्या तुलनेत जड आहे. लंकेचा नवा कर्णधार दिमुथ करूणारत्ने चार वर्षानंतर एकदिवसीय संघात परतला आहे व मागच्या ९ एकदिवसीय सामन्यांपैकी श्रीलंकेने ८ एकदिवसीय सामने गमावलेले आहेत.

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more