वेस्ट इंडिजकडून पाकिस्तान पराभूत

31st May 2019, 02:00 Hrs

नॉटिंघम :जलदगती गोलंदाज ओशन थॉमस (२७ धावांत ४ बळी) व कर्णधार जेसन होल्डरची (४२ धावांत ३ बळी) खतरनाक गोलंदाजी व धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या (५०) वादळी अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १०५ धावांत आटाेपला होता.
दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिजने पाकिस्तानला २१.४ षटकांत १०५ धावांत गुंडाळले होते व मिळालले लक्ष्य १३.४ षटकांत तीन गडी गमावून १०८ धावा करत गाठले होते. अशा प्रकारे पाकिस्तानला सलग अकराव्या एकदिवशीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
पाकिस्तानने अतिशय खराब फलंदाजी केली व नंतर गोलंदाजांकडे लक्ष्याचा बचाव करण्यासाठी धावाच शिल्लक नव्हत्या. थॉमस व होल्डरच्या हल्ल्यानंतर फलंदाजीत गेलने आक्रमण केले व ३४ चेंडूत सहा चौकार व तीन षटकार लगावत ५० धावा ठोकल्या. एकदिवसीयमध्ये गेलचे हे सलग सहावे अर्धशतक असून सलग सहा अर्धशतक लगावण्याच्याबाबतीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या जावेदा मियादाद यांनी सलग ९ अर्धशतके लगावली आहेत.
तत्पूर्वी पाकिस्तानतर्फे फखर झमान व बाबर आझम यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त रियाज (१८) व महम्मद हाफिज (१६) दुहेरी आकडा गाठू शकले. जर दहाव्या क्रमांकावरील फलंदाज रियाजने होल्डरच्या एका षटकात दोन षटकार व एक चौकार लगावत १७ धावा केल्या नसत्या तर पाकिस्तानला तिहेरी आकडा गाठणे अशक्य झाले असते.
विंडीजच्या जलदगती गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली व शॉर्ट पिच चेंडूंनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. पाकिस्तानची स्थिती चार बाद ७५ अशी होती व यानंतर त्यांचा डाव एकदम कोसळला. कोटरेलने पाकिस्तानच्या डावाला सुरुंग लगावला. त्याच्या शॉर्ट पिच चेंडूला हुक करण्याच्या प्रयत्नात इमाम उल हक (२) होपकडे झेल देऊन बाद झाला.
विश्वचषक २०१५ नंतर आपला केवळ तिसरा एकदिवसीय सामना खेळणारा रसेल पहिल्या बदलाच्या रुपात आला. त्याच्या पाचवा चेंडू शॉर्ट पिच होता व फखरने तो चेंडू आपल्या यष्ट्यांवर मारून घेतला. त्याने अशाच प्रकारच्या चेंडूवर हॅरिस सोहेलला (८) यष्ट्यांच्या मागे झेल बाद करवले. बाबर १२ धावांवर असताना हिटमेयरने त्याचा झेल सोडला मात्र तो यात केवळ आणखी दहा धावांची भर घालून बाद झाला. थॉमसच्या चेंडूवर होपने त्याचा शानदार झेल घेतला. यानंतर विंडीजच्या गोलंदाजांनी तळातील फलंदाजांना गुंडाळण्यात वेळ नाही गमावला. होल्डरने ९ चेंडूत सरफराज अहमद, इमाद वसिम व हसन अलीला बाद केले.

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more