इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार

23rd May 2019, 05:53 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

म्हापसा : हरित क्रांती घडवून आणण्यासाठी अकरावी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणात ‘कृषी’ अभ्यासक्रम सक्तीचा करायला हवा. केवळ कृषीमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली इस्राईलला शिष्टमंडळे नेऊन काही उपयोग होणार नाही, असे मत प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी मांडले.      

प्रभूवाडा (कळंगुट) येथे स्व. नारायण रामा नानोडकर यांच्या स्मरणार्थ नानोडकर कुुटुंबियांनी बुधवारी शेतकऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने प्रभारी सभापती लोबो बोलत होते. यावेळी लोबो यांच्या हस्ते २७ शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णनाथ नानोडकर, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, सरपंच शॉन मार्टीन व उपसरपंच सुदेश मयेकर उपस्थित होते.      

   कृषी खात्याचा पदभार सांबाळणारा मंत्री इस्राईलला तेथील कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी जाण्याची परंपराच गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. विद्यमान कृषीमंत्रीही तिथे गेले आहेत. इस्राईलला जाऊन फलनिष्पत्ती काहीच नसते. केवळ सुट्टी घालवण्याचा हा अभ्यास दौरा बनला आहे. आम्ही परदेशात अभ्यास दौरा करून कचरा प्रकल्प उभारण्याचे यशस्वी कार्य केले आहे. तशी इच्छाशक्ती असावी लागते. इस्राईलमधील कृषी लागवडीची अंमलबजावणी गोव्यात व्हायला हवी, तरच या दौऱ्यांना फलप्राप्ती होईल, असे लोबो यावेळी म्हणाले.  

एफडीएवर टीका  

सध्या गोवेकरांना परराज्यातील रसायनयुक्त भाजी व फळे खावी लागत आहेत. पुढे रसायनयुक्त तांदुळ व कडधान्यही खावी लागतील. फॉर्मेलिन मासळीनंतर वेगवेगळ्या शहरात अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रयोगशाळा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर पुढे काहीच हालचाल झालेली नाही, अशी टीका लोबो यांनी यावेळी केली. 

 शिक्षणासह प्रत्यक्ष शेत लागवडीचे धडे शालेय दशेत ‌दिल्यास शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कृषी क्षेत्र मागे राहण्यास प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, असे प्रभारी सभापती लोबो यांनी म्हटले आहे.

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more