सुदीरमन कप : चीनकडून मलेशियाचा पराभव


20th May 2019, 03:32 pm

नेनिंग :यजमान चीनने सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेतील ‘डी’ गटातील पहिल्या सामन्यात मलेशियाचा ५-०ने पराभव केला. ऑल इंग्लंड उपविजेता मलेशियाच्या आरोन चिया व सोह वुई यिक या पुरुषांच्या जोडीला जाग​तिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील ली जुनहुई व लियू युचेन या चिनी जोडीने २१-१८, १४-२१, २२-२४ने पराभूत केले.
महिलांच्या एकेरीत सोनिया चीहचा चीनच्या चेन युफेईने १५-२१, २३-२१, १४-२१ने पराभव केला. पुरुषांच्या एकेरीत शी युकीने ली जी जियाचा २१-१२, २१-११ने पराभव केला. महिलांच्या दुहेरीत विवियन हू व चेंग वेन या जोडीचा चीनच्या डु युई ली यिन्हुईने १८-२१, १४-२१ने पराभव केला.
मिश्र दुहेरीत मलेशियाच्या तान मियांग केन व लाई पेई जिंग या जोडीला चीनच्या हुआंग याकियांग व झेंग सिवेईकडून ३१ मिनिटांत १६-२१, १२-२१ने पराभवाचा सामना करावा लागला. मलेशियाचा पुढचा सामना मंगळवारी भारताविरुद्ध होणार आहे.