ओशेल येथे रेती उत्खननावर छापा

होड्यांसह कामगारांचे पलायन : पाच होड्यांसह २३२ घन मीटर रेती जप्त

16th May 2019, 06:27 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
ओशेल शिवोली येथे मच्छीमारी जेटीजवळ शापोरा नदीत बेकायदा करण्यात येणाऱ्या रेती उत्खननाच्या ठिकाणी खाण खात्याने संयुक्तरीत्या छापा मारून पाच होड्यांसह २३२ क्यूबिक (घन) मिटर रेती हस्तगत केली आहे.
ओशेल येथे मच्छीमारी जेटीजवळ बेकायदा रेतीची उत्खनन होत असल्याची तक्रार स्थानिक मच्छीमारांनी खाण खात्याकडे केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास खाण खाते, कॅप्टन ऑफ पोर्ट, मामलेदार, शिवोली किनारी पोलिस व हणजूण पोलिसांनी संयुक्तरीत्या हा छापा मारला.
छाप्यावेळी नदीत सुमारे ४० होड्यांद्वारे रेतीचे उत्खनन सुरू होते. छापा मारताच होड्यांसह कामगारांनी पळ काढला. तर नदी किनारी असलेल्या पाच होड्यांना या पथकाने पकडले. जेटीच्या शेजारी नदी किनारी रेतीचे मोठ मोठे ढीग साठवून होते. खाण खात्याचे सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ सुधीर मांद्रेकर, म्हापसाचे संयुक्त मामलेदार कृष्णा गावस यांनी पोलिसांच्या सहाय्याने पकडलेल्या होड्या व रेती जप्त केली. तसेच खाण खात्याने ही रेती ट्रकाद्वारे उचलून नेऊन सुरक्षितस्थळी ठेवली आहे.
...............
होडी​ मालकांची विनंती फेटाळली
रेती उत्खननाच्या ठिकाणी छापा मारल्याची माहिती मिळताच काही होड्यांच्या मालकांनी घटनास्थळी धाव घेतली व अधिकाऱ्यांकडे कारवाई न करण्याची विनंती केली. परंतु अधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. तसेच या रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी खाण व कॅप्टन ऑफ पोर्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी या जेटी ठिकाणी पोलिसांनी लक्ष ठेवण्याचा आदेश दिला आहे.
......................
कोट
आम्हाला तक्रार आली होती. त्यानुसार हा छाटा टाकण्यात आला. छाप्यावेळी २० च्या आशपास होड्या रेती उत्खनान गुंतल्या होता. आम्हा पथकाला पाहून कामगारांनी होड्यासह पोबारा काढला. ज्या होड्या सांपडल्या आहेत. त्या कॅप्टन ऑफ पोर्ट व किनारी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या रेतीची पावणी करण्यात येईल.
-सुधीर मांद्रेकर, खाण खात्याचे सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ         

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

तेंडुलकरांनी खासदार निधीतून दिलेल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचा शुभारंभ

औद्योगिक वसाहतीसाठी वाहन उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत Read more

पणजी, म्हापसा, वास्को ओडीपींत २०० कोटींचा घोटाळा

आराखडे तात्काळ रद्द करून दोषींवर कारवाई करा : गिरीश चोडणकर Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more