वेळसाव येथे मटका जुगारावर छापा

दोन संशयितांना अटक : रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

15th May 2019, 06:17 Hrs
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी :
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने वेळसाव येथील मार्केट जवळ असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा मारून नितीन छलके (४४, आरोशी फळवाडा - कासावली) आणि संजय गुप्ता (३०, उबेल्डो - वेळसाव) या दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्हा शाखेने १७ हजार ७१० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, वेळसाव येथील मार्केट जवळ परिसरात मोठ्या प्रमाणात मटका जुगार सुरू असल्याची माहिती गुप्तहेरांनी पोलिस निरीक्षक राजेश कुमार यांना दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय पेडणेकर, पोलिस शिपाई विनायक सावंत, परेश नाईक आणि चालक सुदेश माटकर यांचे पथक दोन साक्षीदारांना घेऊन सोमवारी दि. १३ रोजी सायंकाळी ६.५० वेळसाव येथील मार्केट परिसरात पोहचले व मटका जुगारावर छपा मारून संशयित नितीन छलके आणि संजय गुप्ता यांना ताब्यात घेतले. मात्र पोलिसांना पाहून त्या ठिकाणी असलेल्या इतर ग्राहकांनी तेथून पळ काढला.
यावेळी संशयिताची झडती घेतली असता नितीन याच्याकडे असलेले १७ हजार १० रुपये तर संजय कडे ७०० रुपये सापडले. दोघांकडूनही मिळून १७ हजार ७१० रुपये व मटका जुगार साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर पथकाने दोघा संशयितांच्या विरोधात गोवा जुगार कायद्याच्या कलम ११(२)ए नुसार गुन्हा दाखल करून संशयित नितीन छलके आणि संजय गुप्ता यांना रीतसर अटक केली. पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय पेडणेकर पुढील तपास करीत आहेत.                   

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more

वीज वाहिनी व्यापणार पश्चिम घाटातील १७७ हेक्टर जागा

धारवाडमधून गोव्यात ४०० केव्हीची नवी वाहिनी Read more

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more