मोरजीत पर्यटनाच्या नावाखाली खारफुटीची कत्तल

मोरजीत पर्यटनाच्या नावाखाली खारफुटीची कत्तल


15th May 2019, 06:16 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे :
मोरजी पंचायत क्षेत्रातील बागवाडा शापोरा नदी किनारी संवेदनशील भागातील काही जमिनी विकत घेऊन खारपुटीचे झाडे कापण्यास बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणात खारपुटीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
बागवाडा येथील स्मशानभूमी शेजारील ही जागा किनारी भागातील एका हॉटेल मालकाने विकत घेतली असून या जागेत आता दिल्लीतील एक नागरिक बंदी असतानाही झाडाची कत्तल करत आहे. या विषयी स्थानिकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे फोनवरून तक्रार दिली; मात्र त्याची दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मोरजी समुद्र किनारा यापूर्वीच स्थानिक आणि बिगर गोमंतकीय उद्योजकांनी उद्ध्वस्त केल्यामुळे पर्यटन व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. आता या व्यावसायिकांच्या नजरा शापोरा नदी किनारी गेल्या आहेत.
समुद्र किनाऱ्यावरील वाळूच्या टेकड्या नष्ट करून पर्यावरणाला हानी पोहोचवली आहे. पूर्वीच खरेदी केलेल्या शापोरा नदी किनारी भागातील जागेलि खारफुटीची झाडे कापून पर्यटनाच्या गोंडस नावाखाली पर्यावरणाची हानी केली जात आहे. ही खारफुटीची झाडे कापून बांधकाम उभारण्याची तयारी चालवलेली आहे. या विषयी स्थानिकांनी तोंडी तक्रारी केल्या; मात्र दखल घेतली नसल्याने लोकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.  

हेही वाचा