भारतीय हॉकी संघाकडून ऑस्ट्रेलिया ‘ए’ ३-० गोलने पराभूत

10th May 2019, 03:45 Hrs

पर्थ :पुनरागमन करणाऱ्या रुपिंदर पाल सिंगने खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियरच्या दोन गोलांच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी ऑस्ट्रेलिया ‘ए’चा ३-०ने पराभव केला. दुखापतीमुळे ८ महिन्यानंतर स्पर्धेत खेळणारा ड्रॅग फ्लिकर रुपिंदरने सहाव्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती.
यानंतर सुमितने १२व्या व १३व्या मिनिटाला गोल करत भारताला सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने आक्रमक खेळ दाखवत पहिल्या क्वार्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला व प्रतिस्पर्धी संघावर सतत आक्रमण करत राहिले.
भारताची ही रणनीती यशस्वी राहिली व सर्व तिन्ही गोल भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये करत यजमान संघाला बॅकफूटवर ढकलले. भारताचा पहिला गोल तेव्हा झाला जेव्हा संघाने पहिला शॉर्ट कॉर्नर मिळवला. रुपिंदरने चांगला फॉर्म दाखवत फ्लिक करत शानदार टायमिंग करताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलरक्षकाला चकवत गोल केला. डिफेंडर हरमनप्रीत सिंगच्या शानदार टॅकलिंगने ऑस्ट्रेलिया ‘ए’ला चेंडूवर ताबा मिळवणे कठीण होत होते व यामुळे भारताने दुसरा गोल केला. मनप्रीत सिंगच्या मदतीने युवा खेळाडूने १२व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल केला.
पुढच्या मिनिटाला भारताने तिसरा गोल केला. स्ट्रायकर आकाशदीप सिंगने गोल करण्याची संधी निर्माण केली व २१ वर्षीय सुमितने याचा फायदा उठवत भारतासाठी तिसरा गोल केला. अशा प्रकारे पहिल्या क्वार्टरमध्ये ३-० अशा आघाडीमुळे भारताचा आत्मविश्वास वाढला.
हरमनप्रीत भारतीय बचावफळीत महत्त्वाचा ठरला. त्याने बऱ्याच वेळा ऑस्ट्रेलियाई खेळाडूंकडून चेंडू काढून घेऊन यजमान संघाची लय तोडली. भारतीय संघाचा आता पुढचा सामना साेमवारी होणार आहे.
सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक ग्राहम रेड यांनी सांगितले, पुढचा सामना कठीण असणार आहे व त्यासाठी आम्ही तयार आहोत. आजच्या विजयामुळे भारतीय संघ मजबूत होणार आहे, कारण ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघात सात राष्ट्रीय खेळाडू होते.

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more