तिरंदाजी विश्वचषक : भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी

10th May 2019, 03:45 Hrs

शंघाई :भारतीय तिरंदाजांचे रिकर्व व कंपाउंड दोन्ही गटात वैयक्तिक सांघिक स्पर्धेत प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. विश्व तिरंदाजी स्पर्धेत एकही भारतीय पदकाच्या शर्यतीत स्थान मिळवू शकला नाही.
जगदीश चौधरी, चमन सिंग व सुखचैन सिंग या भारताच्या पुरुष रिकर्व संघाला बांगलादेशच्या कमी मानांकन प्राप्त संघाने ५-१ने पराभूत केले. दोन्ही संघांनी पहिल्या सेटमध्ये ५४ गुण मिळवत सुरुवात केली होती मात्र दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये भारतीय तिरंदाजांचा नेम चूकला व यामुळे भारतीय संघ उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाला.
परविना, मोनाली जाधव व प्रिया गुर्जरचा कंपाउंड महिला संघही चिनी तायपेईविरुद्ध २१९-२३१ने पराभूत झाला. रिकर्व महिला संघही दुसऱ्या फेरीत अमेरिकेविरुद्ध ६-२ने पराभूत झाला. चौथे मानांकन प्राप्त पुरुष कंपाउंड संघ पहिल्या फेरीचा अडथळा पार करू शकला नाही व १३वे मानांकन प्राप्त न्यूझीलंडच्या संघाकडून २२३-२२०ने पराभूत झाला.
भारताला आता रिकर्व व कंपाउंड दोन्ही गटात मिश्र जोडी स्पर्धेतून पदकांची अपेक्षा आहे. व्ययक्तिक गटात भारतीय तिरंदाजांचे प्रदर्शन खराब राहिले व एकही भारतीय पदकाच्या शर्यतीत स्थान मिळवू शकला नाही. वल्किराज डिंडोरला पुरुषांच्या रिकर्व उपउपांत्यपूर्व फेरीत चिनी तायपेईच्या वेई चून हेंगविरुद्ध त्याला ७-३ने पराभव स्वीकारावा लागला.
अंकिताला उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या सातवे मानांकन प्राप्त मेंग फान्शूविरुद्ध शूटआऊटमध्ये पराभव स्वीकारवा लागला. मेंगने शूटआउटमध्ये ‘परफेक्ट १०’ मिळवत अंकिताला मागे टाकले. प्रीतीला तिसऱ्या फेरीत ब्रिटनच्या नाओमी फोल्कार्डने ६-४ने नमवले. 

Top News

मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका Read more

पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका Read more

चुकीच्या पद्धतीने कर आकारल्याचा कॅसिनो कंपन्यांचा दावा

जीएसटी मंडळासमोर कंपन्यांचे गाऱ्हाणे; पुढील बैठकीत अंतिम निर्णय Read more