बंगळुरूला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी विजयाबरोबर नशिबाचीही गरज


25th April 2019, 03:39 pm
बंगळुरूला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी विजयाबरोबर नशिबाचीही गरज

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीग आता सावकाश आपल्या अखेरच्या प्रवासाकडे निघाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या स्थानावर आहे तर सलग सहा सामने गमावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुढील ५ पैकी चार सामने जिंकला आहे. आता बंगळुरूच्या चाहत्यांना अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये दाखल होतो तर आयपीएलमध्ये हा एक विक्रम होईल. एकही संघ सुरुवातीचे सहा सामने गमावून प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. २०१४ साली मुंबई इंडियन्सच्या संघाने सुरुवातीचे पाच सामने गमावल्यानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. आयपीएलमध्ये कमीत कमी सात सामने ​जिंकूनच संघ प्लेऑफचा विचार करू शकतात.
बुधवारी बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबचा १७ धावांनी पराभव केला व आता ते गुणतक्त्यात सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. जर बंगळुरू पुढील सर्व सामने जिंकण्यात यशस्वी झाला तर ते एखाद्या आश्चर्याची अपेक्षा करू शकतात.
बंगळुरूच्या गाेलंदाजांनी आता थोडा दम दाखवण्यास सुरुवात केली आहे. बुधवारीही त्यांनी गोलंदाजीत संतुलन ठेवत एका अतिरिक्त फिरकीपटूला संधी दिली. संघासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ​निवृत्ती स्वीकारली असून त्याला विश्वचषकासाठी संघाला मध्येच सोडण्याची गरज नाही. यामुळे तो संपूर्ण संत्र बंगळुरूसोबत असणार आहे.
यष्टिरक्षक पार्थिव पटेलने फलंदाजीने बऱ्याच वेळी आपल्या संघाचा अग्रक्रम सांभाळून ठेवला आहे. याशिवाय बंगळुरूला आपले उर्वरित तीन सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. हेदेखील त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
बंगळुरूसाठी चिंतेचा विषय
ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोईनिस व इंग्लंडचा अष्टपैलू विश्वचषकाच्या तयारीसाठी आपल्या संघात पुन्हा परतणार आहेत. दोन्ही खेळाडू फलंदाजी व गोलंदाजीमुळे संघात संतुलन बनवून होते व त्यांचे नसणे संघाला मोठा धक्का असू शकतो. बंगळुरूकडे विदेशी खेळाडूंची कमतरता नाही मात्र न्यूझीलंडचा कॉलिन डी ग्रँडहोम व वेस्ट इंडिजच्या शिमरन हिटमेयर यांनी अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केले नाही. याशिवाय बंगळुरूची धावगती -०.६८३ असून स्पर्धेतील सर्वांत खराब धावगती असल्यामुळे त्यांना पुढे याचा फटका बसू शकतो.
प्रत्येक सामन्यात विजय गरजेचा
बंगळुरूच्या संघाला आपले सर्व सामने जिंकावे लागती व असे झाल्यास त्यांचे १४ गुण होऊ शकतात. यानंतर त्यांना इतर संघांच्या विजय पराभवावर अवलंबून रहावे लागणार आहे. जर कोलकाता नाईट रायडर्स व सनरायजर्स हैदराबाद आपले सर्व सामने गमावतात तर बंगळुरूला प्लेआफॉची संधी थोडी अधीक होऊ शकते.