जुझे फिलिप - सौफुल्ला खान यांच्यातील वाद अखेर मिटला

वास्कोतील मयनॉरिटी यूथ ग्रुपच्या वतीने बैठकीचे आयोजन

15th April 2019, 02:13 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसाोझा व काँग्रेस प्रदेश समितीचे सरचिटणीस सैफुल्ला खान यांच्यातील वाद मिटविण्यात आला. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वास्कोतील मयनॉरिटी यूथ ग्रुपच्या वतीने ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला डिसोझा, खान यांच्यासह उमेदवार फ्रान्सिस सार्दिन, संकल्प आमोणकर, नितीन चोपडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रीतम नाईक, नझीर खान आदी उपस्थित होते.
ही बैठक त्या हॉटेलातील सभागृहाच्या बंद दाराआड घेण्यात आली. या बैठकीचे फोटो किंवा व्हिडियोग्राफी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. तेथे कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. डिसोझा व खान यांच्यातील वाद मिटण्यास ही बैठक लाभदायक ठरल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत डिसोझा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर खान हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी डिसोझा यांना ४२०२ मते तर खान यांना ३७३७ मते मिळाली होती. तथापि गेल्या आठवड्यात भाजप समर्थक असल्याचा आरोप डिसोझा व खान यांनी एकमेकांवर केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्यातील वाद काँग्रेसच्या मतांवर परिणाम करण्याचे संकेत मिळाल्याने तो वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यासाठी संकल्प आमोणकर यांनी पुढाकार घेतला होता.
या बैठकीत नेमके काय ठरले, हे उघड झाले नसले तरी या बैठकीच्या निमित्ताने डिसोझा व खान यांच्यातील वाद मिटला. उत्तर गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असल्याने तेथे ते काँग्रेस, भाजपविरोधात लढत आहे. परंतु दक्षिण गोव्यात राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्याने त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा, यासंबंधी अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. यासंबधी येत्या १७ तारखेला निर्णय जाहीर करण्यात येईल, असे डिसोझा यांनी या प्रतिनिधीला सांगितले. तथापि आतील कानोसा घेतला असता राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसलाच मिळणार आहे. 

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

वीज बिले आता डेबिट, क्रेडीट कार्डद्वारे

१ ऑगस्टपासून सक्ती; वीजमंत्र्यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ; चेक, डीडीला फाटा Read more

Top News

मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका Read more

पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका Read more

चुकीच्या पद्धतीने कर आकारल्याचा कॅसिनो कंपन्यांचा दावा

जीएसटी मंडळासमोर कंपन्यांचे गाऱ्हाणे; पुढील बैठकीत अंतिम निर्णय Read more