जबाबदारी पेलून दाखवणार : जोशुआ

15th April 2019, 02:09 Hrs

प्रतिनिधी गोवन वार्ता
म्हापसा : एक तरुण या नात्याने मी मौजमजा करतो पण आमदार म्हणून जबाबदारी खांद्यावर पडल्यावर लोकांच्या अपेक्षांना आपण खरे ठरण्याचा निश्चितच प्रयत्न करेन, असे म्हापसा पोट निवडणुकीतील भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी रविवारी सांगितले.
निवडणूक रिंगणात असलेला मी सर्वांत तरुण उमेदवार असून कदाचित विधानसभेतही मी तरुण आमदार असेन, असे त्यांनी सांगितले. मी वेगळ्या पिढीतील आहे. मी मौजमजा करतो. बाहेर जातो पण जबाबदारी पडल्यावर ती मी निश्चित खंबीरपणे पार पाडणार व लोकांना माझ्यात बदल झालेला दिसेल, असे जोशुआने सांगितले.
वैयक्तिक जीवनावर आधारित विरोधकांनी चालविलेल्या प्रचाराबद्दल ‘गोवन वार्ता’ने विचारणा केली असता त्यांनी वरील प्रकारे त्याचे उत्तर दिले. जाहीरनाम्यात दिलेल्या सगळ्या आश्वासनांची पूर्तता करून दाखविणे हेच आपले विरोधकांना चोख उत्तर असेल, असे त्यांनी सांगितले. आपण काही वाईट केलेले असेल तर त्याचे पुरावे लोकांसमोर आणण्याचे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे.            

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more