डॉ. आंबेडकरांचे विचार आचरणात आणा

डिचोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

15th April 2019, 05:40 Hrsप्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : दलित समाजासाठी व भारताच्या विकासासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेले योगदान महान आहे. त्यांचे विचार सतत आचरणात आणून दलित बांधवांनी आपला उत्कर्ष साधण्यासाठी कष्ट करावेत. दुर्दैवाने आजही दलित समाज अनेक योजना व सुविधांपासून वंचित आहे, असे प्रतिपादन गोविंद परवार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हरिजनवाडा बोर्डेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्मारक समितीचे गोविंद परवार, राजू व खुशाली परवार, नगरसेवक गुरुदत्त पळ आदींनी पुष्पहार अर्पण करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पहिले होते ते साकार करण्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे, असे मत राजू परवार व खुशाली परवार यांनी व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more