बेताळवाडा येथे १७ पासून कार्यक्रम

15th April 2019, 05:39 Hrs


वार्ताहर। गोवन वार्ता
आमोणे : बेताळवाडा येथील श्री संकटमोचन हनुमान देवस्थानच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १७, १८ व १९ एप्रिल असे सतत तीन दिवस उत्सव होणार आहे.
दि. १७ रोजी स्थापनादिन असून त्यानिमित्त विविध धार्मिक विधी, रात्री आरती, दि. १८ रोजी सकाळी गणेशपूजा, अभिषेक, आरती, गाऱ्हाणे, सायंकाळी भजन, आरती, प्रसाद वाटपाने समाप्ती होणार आहे. दि. १९ रोजी तिसऱ्या दिवशी हनुमान जयंती उत्सव निधीवत संपन्न होणार असून संध्याकाळी भजन, आरती होईल. रात्री १० वा. श्री हनुमान सेवा समिती आयोजित राज फेशीलीट, पर्वरी आणि डॉ. वेदांगी दामोदर मोरजकर पुरस्कृत व कला चेतना, वळवय निर्मित, विश्वनाथ कुट्टीकर प्रस्तुत कॉमेडी दोन अंकी कोकणी नाटक ‘फार्मोलिन जावय’ सादर होणार आहे. लेखक उमेश नायक, निर्माता राजदीप नायक आहेत. कार्यक्रमास भक्तगणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केलेले आहे.       

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more