निवडणूक काळात दारू वाहतुकीवर निर्बंध


09th April 2019, 04:47 pm

पणजी : कर्नाटक राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १८ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २३ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तसेच २३ मे २०१९ रोजी मतमोजणीच्या दिवशी कर्नाटक राज्यातील बेळगाव व कारवार जिल्ह्यांच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण तालुक्यातील पोळे गाव व सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावच्या परिसरात कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कुटुंबासहित बीअरव्यतिरिक्त देशी बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची, तसेच देशी दारूची पाऊण बाटली आणि बीअरच्या ६५० मि.ली.च्या ६ बाटल्या अशा कमाल मर्यादेत दारूची वाहतूक करण्याची सूट देण्यात आली आहे.

तसेच, गोव्यातील लोकसभा व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू वाहतूक किंवा जवळ बाळगण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार गोवा राज्यात २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २३ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आणि २३ मे २०१९ रोजी मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कुटुंबासहित बीअरव्यतिरिक्त देशी बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची, तसेच देशी दारूची पाऊण बाटली आणि बीअरच्या ६५० मि.ली.च्या ६ बाटल्या, अशा कमाल मर्यादेत परमिटशिवाय दारूची वाहतूक करता येईल किंवा जवळ बाळगता येईल, असे संबंधित यंत्रणेने कळवले आहे.

हेही वाचा