फिफाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी प्रफुल पटेल

06th April 2019, 03:20 Hrs

कौलालंपूर :अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या परिषदेत निवडण्यात आलेले प्रथम भारतीय पटेल यांना ४६ पैकी ३८ मते पडली. आशियाई फुटबॉल परिसंघातर्फे (एएफसी) पाच सदस्यांच्या फिफा सदस्यांच्या परिषदेसाठी निवडण्यात आले असून यात एएफसीचे अध्यक्ष व एक महिला सदस्य आहेत.
कौलालंपूरमध्ये शनिवारी एएफसीच्या २९व्या सभेत ही निवड करण्यात आली. सदस्यांची निवड २०१९ ते २०२३ सलापर्यंत चार वर्षांसाठी करण्यात आली आहे. फिफासाठी निवड झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले, मी यासाठी सर्वांचा आभारी आहे. मला या पदावर निवडणून आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. यावेळी पटेल यांच्यासोबत एआयएफएफचे महासचिव कुशल दास व वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रत दत्ता होते.
पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारताने फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते. यानंतर भारताने २०२० वर्षासाठी फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वचषकाचे यजमानपद मिळवले. परिषदेसाठी पटेल यांच्या व्यतिरिक्त अल मोहन्नदी (कतार), खालिद अवाद अल्तेबिती (सौदी अरब), मारियानो व्ही. अरनेटा ज्युनिअर (फिलिपीन), चूंग मोंग ग्यू (कोरिया), दू झोकाई (चीन), मेहदी ताज (इारण) व कोह्जो तशिमा (जपान) यांनीही उमेदवारी दाखल केली होती.

Top News

मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका Read more

पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका Read more

चुकीच्या पद्धतीने कर आकारल्याचा कॅसिनो कंपन्यांचा दावा

जीएसटी मंडळासमोर कंपन्यांचे गाऱ्हाणे; पुढील बैठकीत अंतिम निर्णय Read more