मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

01st April 2020, 05:31 Hrs


प्रतिनिधी । गोवन वार्ता

पेडणे :

मोरजी टेंबवाडा येथील टर्टल हॉटेलच्या शौचालय ट्रीटमेंट प्लांटची दुर्गंधी येण्याचा प्रकार भहिन्याभरापासून सुरू आहे. रविवार सकाळपासून दुर्गंधीच्या प्रमाणात खुपच वाढ झाल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त बनले अाहेत. दोन दिवसांत यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून दुर्गंधी बंद न केल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

दरम्यान, आज सोमवारी तुये हॉस्पिटलच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारण्यात येईल, असे पंच प्रकाश शिरोडकर, विनोद पेडणेकर यांच्या स्थानिक नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या हॉटेलच्या बाजूलाच मंदिर व काही अंतरावर शाळा आहे. या शिवाय आसपास मोठ्या प्रमाणात घरे आहेत. या हॉटेलच्या शौचालयाचा ट्रीटमेंट प्लान्ट तयार केला आहे; मात्र गेल्या महिन्याभरापासून या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. आरोग्य खाते व संबंधित हॉटेल मालकाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या; मात्र अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हॉटेलच्या शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून जेवतानाही त्रास होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर त्याविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला. यावेळी स्थानिक पंच प्रकाश शिरोडकर, पंच पवन मोरजे, विनोद पेडणेकर स्थानिक युवक व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, हॉटेल चालकाने यावर दोन दिवसांत याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.        

Related news

आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आम्हाला नाही का ?

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे कँटीन कंत्राटदार रंजन मयेकर यांचा सवाल Read more

उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी म्हणजे निव्वळ धूळफेक

सुदीप ताम्हणकर यांची टीका; राज्यात अंमलबजावणी न करण्याचीही मागणी Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more