कला अकादमीचे शुद्धीकरण वादात

पर्रीकरांचे पार्थिव ठेवलेल्या ठिकाणी विधी


23rd March 2019, 05:04 pm
कला अकादमीचे शुद्धीकरण वादात

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव कला अकादमीच्या ज्या जागेत अंत्यदर्शनासाठी ठेवले होते त्या जागेचे आज कला अकादमीच्या प्रशासनाने शुद्धीकरण केल्याने खळबळ माजली आहे. सार्वजनिक वास्तूत शुद्धीकरणासारखे कार्य केल्यामुळे कला अकादमीचे प्रशासन वादात सापडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे अकादमीने कला संस्कृती मंत्री आणि कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना शुद्धीकरण करण्यापूर्वी विचारले होते. दरम्यान, त्यांनी या विषयी एखाद्या ब्राह्मणाला विचारून काय तो निर्णय घ्या असे सांगितल्यानंतर कला अकादमीच्या प्रशासनाने आज अकादमीच्या वास्तुचे शुद्धीकरण केले. विशेषत: त्या जागेचे शुद्धीकरण केले ज्या जागेत पर्रीकर यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवला होता.

हेही वाचा