स्मिथ राजस्थानच्या ताफ्यात दाखल


18th March 2019, 04:22 pm
स्मिथ राजस्थानच्या ताफ्यात दाखल

जयपूर :चेंडू कुरतडल्या प्रकरणी शिक्षा पूर्ण केल्यानंतर पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथ जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल शिबिरात सहभागी झाला आहे. स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्मिथकडून राजस्थान रॉयल्सला मोठ्या अपेक्षा आहेत. संघाचा सदिच्छा दूत शेन वॉर्नने सांगितले, त्याला पूर्ण विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची धावांची भूक कमी झाली नसेल. वॉर्नने पुढे सांगितले की, क्रिकेट खेळण्यासाठी स्मिथ आतूर आहे.
रॉयल्सचा आणखी एक खेळाडू एश्टन टर्नर १ एप्रिलपर्यंत उपलब्ध नसणार. तो पाकिस्तानविरुद्ध २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या मालिकेत खेळणार आहे. एश्टनच्या खेळीमुळे मोहालीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने ३५० धावांचे लक्ष्य गाठले होते.