रजनेश गुणेश्वरनला कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारी


18th March 2019, 04:21 pm

नवी दिल्ली : इंडियन वेल्स एटीपी टेनिस टुर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन करणारा भारतीय टेनिस खेळाडू प्रजनेश गुणेश्वरन एटीपीच्या नव्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान ८४वर पोहोचला आहे. दुसरीकडे दुखापतग्रस्त युकी भांबरी जवळपास दोन वर्षानंतर प्रथमच पहिल्या २००मधून बाहेर झाला आहे.
एटीपी मास्टर्स सीरिजच्या तिसऱ्या फेरीत पोहोचणाऱ्या प्रजनेशला ६१ रेटिंग गुणांचा फायदा झाल्यामुळे त्याच्या क्रमवारीत १३ स्थानांचा फायदा झाला. या स्पर्धेत त्याने जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावरील निकोलोज बासिलाशविलीचा पराभव करत आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय मिळवला होता.
भारताचे इतर टेनिसपटू व त्यांची क्रमवारी
रामकुमार रामनाथन (१३९)
युकी भांबरी (२०७)
साकेत मायनेनी (२५१)
शशी कुमार मुकुंद (२६८)
दुहेरी क्रमवारी
जीवन नेदुंचेझियान ६४वा
रोहन बोपन्ना ३६वा
दिविज शरण ४१वा
पूरव राजा ८०वा
लिएंडर पेस ९४वा
महिलांची क्रमवारी
अंकिता रैना १६८
करमन कौर थांडी २०३