सांत इनेज येथील मटका अड्ड्यावर छापा

६१ हजारांची रोकड जप्त; पाच जणांना अटक


15th March 2019, 03:21 am

पणजी : उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांत इनेज येथील एका इमारतीतील मटका अड्ड्यावर छापा टाकून ६१,२०० रुपयांची रोकड, मोबाईल, प्रिन्टर, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केली. तसेच माधव या मुख्य मटकाबुकीसह पाच जणांना अटक केली आहे.
सांत इनेज येथील एका इमारतीतील सदनिकेत जुगार चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने गुरुवारी संध्याकाळी तेथे छापा टाकला. चौधरी यांनी स्वत: त्या वेळी तेथे उपस्थित होत्या. पोलिसांनी माधव हैदादुग्गी, सचिन हैदादुग्गी या मूळ बेळगाव येथील दोघांना, तसेच श्रीकांत शिरवईकर, गुफ्रान शेख व संदीप धारेश्वर या तीन स्थानिक युवकांना अटक केली. पोलिसांनी २ प्रिन्टर, ५ मोबाईल, १२ कॅल्क्युलेटर, ३ टेबल जप्त करून सीलबंद केली आहेत.