घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान

15th March 2019, 06:04 Hrs


काणकोण : पैंगीण येथे बुधवारी मध्यरात्री एक मोठे आंब्याचे झाड वेलवाडा येथील दीपक नाईक यांच्या घरावर उन्मळून पडले. यामुळे घराचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. छताचे वासे, कौले व भिंतीचा काही भाग या झाडामुळे कोसळला, अशी माहिती काणकोण अग्नीशमन कार्यालयाने दिली. सुदैवाने रात्री घरावर झाड पडूनही घरातील कोणालाही जखमी झाला नाही. गुरुवारी सकाळी अग्नीशमन दलाच्या जवानांनी झाड घरावरुन हटविले. काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस, पैंगीणचे पंच प्रवीर भंडारी व इतरांनी घटनास्थळाला भेट देऊन कुटुंबाची चौकशी केली.            

Related news

लिफ्ट देणे कार चालकाच्या बेतले जीवावर

सिरसईच्या जीवन च्यारींचा जांबोटीत मृतदेह; खून करून पळवली कार Read more

साडेनऊ महिन्यांनंतर मडकईकर विधानसभेत

शरीराची डावी बाजू कमजोर, पण उत्साह पूर्वीसारखाच Read more

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more