बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडचा मालिका विजय

12th March 2019, 02:57 Hrs

वेलिंगटन : शॉर्ट पिच गोलंदाजीचा तज्ञ नील वॅगनरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशला मंगळवारी दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी डाव व १२ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत अपराजीत आघाडी घेतली आहे. या सामन्यातील पहिले दोन दिवस पावसामुळे वाया गेले होते.
मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी अपराजीत आघाडी घेतली असून आहे. न्यूझीलंड प्रथमच सलग पाच मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. यजमानांनी मालिकेतील पहिला कसोटी सामना डाव व ५२ धावांनी जिंकला होता.
वॅगनरच्या घातक बाउंसरचे उत्तर बांगलादेशच्या फलंदाजांकडे नव्हते. त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात ४५ धावा देत ५ गडी बाद केले. त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ २०९ धावांत आटाेपला. बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद २११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सामनावीर रॉस टेलरच्या (२००) द्विशतकाच्या जोरावर सहा बाद ४३२ धावा करत डावाची घोषणा केली.
वॅगनरला ट्रेंट बोल्टची चांगली सोबत मिळाली. त्याने ५२ धावा देत चार गडी बाद केले. बांगलादेशने पाचव्या दिवशी तीन बाद ८० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, मात्र कर्णधार महमुदुल्लाह व महम्मद मिथून (४७) वगळता त्यांचे इतर फलंदाज खेळपट्टीवर टिकण्यात अपयशी ठरले. महमुदुल्लाहने ६९ चेंडूत ६७ धावा केल्या परंतु आपल्या संघाला डावाच्या पराभवाने वाचवू शकला नाही. तिसरा व अंतिम सामना शनिवारी ख्राईस्टचर्चमध्ये खेळवण्यात येणार आहे.
संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश : प. डाव : सर्वबाद २११, दु. डाव सर्वबाद २०९ धावा : महम्मद मिथून झे. साउथी गो. वॅगनर ४७, सौम्य सरकार झे. टेलर गो. बोल्ट २८, महमुदुल्ला झे. बोल्ट गो. वॅगनर ६७, अबू झायद (नाबाद) ०. गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट १६-५-५२-४, नील वॅगनर १४-४-४५-५.
न्यूझीलंड : प. डाव : ६ बाद ४३२ धावा (घोषित) : केन विलियम्सन झे. गो. तैजूल ७४, रॉस टेलर झे. दास गो. मुस्तफिजूर २००, हेन्री निकोल्स त्रि. गो. तैजूल १०७, कॉलिन डी ग्रँडहोम (नाबाद) २३.
गोलंदाजी : अबू झायद १८.२-२-९४-३, तैजूल इस्लाम २१-०-९९-२.    

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more