‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी

17th February 2019, 05:19 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : फोमेंतो मीडयाने श​निवारी सायंकाळी मिरामार किनाऱ्यावर मेणबत्त्या लावून पुलवामा येथील स्फोटात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पाकिस्तानचा निषेध नोंदविला.              

फोमेंता मीडियाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. भारताविरोधात वारंवार अशी कृत्ये करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध नोंदवित आता पाकिस्तानला अद्दल घडविण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी उषा नार्वेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, शनिवारी वाढदिवस असलेल्या वास्को येथील राहुल हळदणकर या युवकाने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत, तो श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित राहिला. 

माजी सैनिकांकडून श्रद्धांजली

माजी सैनिक संघटनेने शनिवारी पणजीतील आझाद मैदानावर पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना चोख उत्तर देण्याची आणि रक्ताचा बदला रक्तानेच घेण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणत, ‘हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणाही माजी सैनिकांनी दिल्या. यावेळी अनंत जोशी, कॅप्टन दत्ताराम सावंत, कृष्णा शेटकर, मानदेव नारोलकर आदी उपस्थित होते.

Related news

लिफ्ट देणे कार चालकाच्या बेतले जीवावर

सिरसईच्या जीवन च्यारींचा जांबोटीत मृतदेह; खून करून पळवली कार Read more

साडेनऊ महिन्यांनंतर मडकईकर विधानसभेत

शरीराची डावी बाजू कमजोर, पण उत्साह पूर्वीसारखाच Read more

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more