मंत्रिमंडळाची उद्या बैठक


17th February 2019, 05:12 pm

पणजी : राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोना पावला येथील खासगी निवासस्थानी होणार आहे. सध्या बैठकीसाठी फक्त दोन प्रस्ताव आहेत. यात उद्योग खात्याचा औद्योगिकीकरणासाठी जागा अधोरेखित करणे तसेच कार्मिक खात्याच्या पूर्वलक्षी मंजुरीच्या एका प्रस्तावाचा समावेश आहे. 

मागील मंत्रिमंडळ बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ३० जानेवारी रोजी झाली होती. त्या बैठकीत अर्थसंकल्प व इतर काही विधेयके मंजूर करण्यात आली होती. नंतर ती विधेयके विधानसभा अधिवेशनात मांडण्यात आली होती. ती मंत्रिमंडळ बैठक पर्वरी मंत्रालयातच फक्त पाच ते दहाच मिनिटे चालली होती. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी ऐनवेळी काही प्रस्ताव येऊ शकतात.