विदर्भाच्या दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २४५ धावा

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : संजय रघुनाथ, अक्षय वाडकरची अर्धशतके


14th February 2019, 06:22 pm

नागपूर : संजय रघुनाथ (६५) आणि अक्षय वाडकर (नाबाद ५०) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने रणजी विजेत्या विदर्भ संघाने शेष भारत संघाविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी खेळ समाप्त होईपर्यंत आपल्या पहिल्या डावात ६ गडी बाद २४५ धावा केल्या.
येथील व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात शेष भारत संघाने पहिल्या डावात सर्व गडी बाद ३३० धावा केल्या आहेत. विदर्भ संघ अजून ८५ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे चार विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ संमाप्त झाला तेव्हा अक्षय वाडकर ९६ चेंडूत ९ चौकारांच्या सहाय्याने ५० धावांवर तर त्याच्या साथीला अक्षय कर्णेकर १५ धावांवर खेळत होता.
विदर्भच्या फैज फैजलने २७, अथर्व तायडेने १५ तर आदित्य सरवटेने १८ धावा केल्या. मोहित काळे केवळ १ धाव काढून बाद झाला. शेष भारताच्या क्रिशप्पा गौतमने ३३ धावांत २ तर धर्मेंद्रसिंग जडेजाने ६६ धावांत २ गडी गारद केले. अंकित राजपूत व राहुल चहर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी विदर्भाने शेष भारताला पहिल्या डावात ३३० धावांमध्ये गुंडाळले. शेष भारताच्या हनुमा विहारीने (११४) २११ चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने शतक झळकावले तर मंयक अगरवालने १० चौकार आणि ३ षटकार ठोकून ९५ धावांची उपयुक्त खेळी केली. अनमोलप्रीत सिंगने १५, अजिंक्य रहाणेने १३, श्रेयस अय्यरने १९, राहुल चहरने २२ तर अंकित राजपूतने २५ धावा केल्या. विदर्भाच्या अक्षय वखरे आणि आदित्य सरवटेने प्रत्येकी तीन गडी टिपले. रजनीश गुरबानीने दोन तर अक्षय कर्णेवार आणि यश ठाकूर यांनी एक गडी बाद केला.
..............
धावफलक
विदर्भ : (पहिला डाव) ९० षटकांत ६ बाद २४५ धावा. फैज फैजल झे. इशान किशन गो. गौतम २७ (६५ चेंडू ५ चौकार), संजय रघुनाथ झे. हनुमा विहारी गो. जडेजा ६५ (१६६ चे ९ चौ.), अथर्व तायडे पायचीत गो. राहुल चहर १५, गणेश सतीश पायचीत गो. जडेजा ४८ (१०५ चे ४ चौ १ ष), मोहित काळे झे. इशान किशन गो. गौतम १, अक्षय वाडकर नाबाद ५० (९६चे ९ चौ.), अदित्य सरवटे पायचीत राजपूत १८, अक्षय कर्णेवार नाबद १५. अवांतर ६.
गोलंदाजी :
अंकित राजपूत १६-३-४३-१, तन्वीर उल हक १४-४-२९-०, क्रिशप्पा गौतम १०-३-३३-२, धर्मेंद्रसिंग जडेजा २७-६-६६-२, राहुल चहर २३-५-६८-१.
शेष भारत (पहिला डाव) : मयंक अगरवाल झे. गुरबानी गो. यश ठाकूर ९५, अनमोलप्रीत सिंग त्रि.गो. गुरबानी १५, हनुमा विहारी झे. फझल गो. सरवटे ११४, अजिंक्य रहाणे झे. संजय गो.सरवटे १३, श्रेयस अय्यर पायचित गो. कर्णेवार १९, ईशान किशन झे. गुरबानी गो. वखरे २, कृष्णप्पा गौतम झे. गुरबानी गो. वखरे ७,धर्मेंद्र जडेजा त्रि.गो. सरवटे ६, राहुल चहर त्रि.गो. गुरबानी २२, अंकित राजपूत त्रि.गो. वखरे २५, तन्वीर उल हक नाबाद ०. अवांतर : १२. एकूण : ८९.४ षटकात सर्व बाद ३३० धावा.
गोलंदाजी : रजनीश गुरबानी १५-२-५८-२, यश ठाकूर १७-३-५२-१, आदित्य सरवटे २८-५-९९-३, अक्षय कर्णेवार १५-३-५०-१, अक्षय वखरे १४.४-०-६२-३.