सुप्रसिद्ध दि इंडियन हॉटेल्स कंपनीचे गोव्यात पदार्पण

दोन हॉटेलांसोबत व्यवस्थापकीय करार

12th February 2019, 06:45 Hrs

मुंबई : गोव्यातील दोन हॉटेलांशी  व्यवस्थापन करार करून दी इंडियन हॉटेल्स  कंपनीने (आयएचसीएल) या दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या आतिथ्य कंपनीने गोव्यात पदार्पण केले आहे. ही कंपनी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना ५०६ खोल्या उपलब्ध करून देणार आहे.                  

सदर कंपनी गोव्यातील सुप्रसिद्ध २०७ खोल्यांच्या ‘सिदादे द गोवा’चे व्यवस्थापन या पुढे पाहणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या हॉटेल्स व रिसोर्टचा संग्रह असलेल्या सिलेक्शन्स पोर्टफोलिओ याचा ‘सिदादे द गोवा’ यापुढे एक भाग बनणार आहे. या कंपनीतर्फे ‘ताज’ ब्रँडखाली अतिरिक्त २९९ खोल्यांचे एक हॉटेल बांधण्यात येणार असून या वर्षाअखेरीस ते बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.                  

अत्यंत मान्यताप्राप्त असा पोर्टफोलिओ ब्रँड असलेल्या ‘आयएचसीएल’कडील  आमच्या भागीदारीबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. या सहयोगामुळे ‘सिदाद द गोवा’ आपला नवीन विकास पूर्ण क्षमतेने साध्य करेल. तसेच येणाऱ्या कित्येक वर्षांत  ही भागीदारी यशस्वी आणि परस्पर फायद्याची ठरेल, असा विश्वास ‘फोमेन्तो रिसोर्ट अॅण्ड हॉटेल्स’च्या व्यवस्थापकीय संचालिका अंजू तिंबले यांनी सांगितले. आयएचसीएल व आम्ही गोव्याचे गोंयकारपण टिकवून  ठेवू, असे त्या 

म्हणाल्या.                  ‘सिदादे द गोवा’ची वास्तुशिल्प रचना ख्यातकीर्त वास्तुशिल्पज्ञ चार्ल्स कोरिया यांनी केली आहे. दोनापावल परिसरातील वायंगिणी किनारी हे हॉटेल आहे. पर्यटकांमध्ये त्याचे स्वत:चे असे खास आकर्षण आहे. ‘आयएचसीएल’च्या सिलेक्शन्स पोर्टफोलिओमध्ये एप्रिल २०१९ मध्ये त्याचा समावेश होणार आहे. ‘आयएचसीएल’चे नवे हॉटेल याच हॉटेलच्या परिसरात येणार आहे.                  

ताज ब्रँडचे २९९ खोल्यांचे हॉटेल समकालीन डिझाईन असेल. तेथून समुद्राचे मनोहारी दर्शन होणार आहे. सुमारे १२०० चौरसमीटरचे  मोठे सुसज्ज परिषदगृह, २४ तास खुले असणारे रेस्टॉरन्ट व बार हे या हॉटेलचे वैशिष्ट्य ठरणार आहे. २०२० च्या सुरुवातील  ते पर्यटकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे. या सहयोगामुळे  सिदादे द गोवा’                  

गोव्यात सध्या आयएचसीएल ब्रँडची सहा हॉटेले आहेत. तीन हॉटेलांचे सध्या बांधकाम सुरू  आहे. पर्यटकांना काहीतरी नवे द्यायचे, हा त्याचा ध्यास आहे. कोणाला अधिक माहिती हवी असल्यास www.tajhotels.com या संकतेस्थळाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

‘आयएचसीएल’ गोव्यात होणार अधिक बळकट 

१९७४ मध्ये  गोव्यात सिकेरी येथे ‘ताज फोर्ट आग्वाद रिसोर्ट अ‍ॅण्ड स्पा’ हे  समुद्र किनाऱ्यावरील  पहिले रिसोर्ट सुरू केल्यापासून  आयएचसीएलचे गोव्याशी विशेष नाते जुळून आले. या रिसोर्टने जागतिक पर्यटन नकाशावर गोव्याचे नाव पुढे आणले. गोव्यातील प्रसिद्ध अशा तिंबले घराण्याने  सुरू केलेल्या ‘सिदादे द गोवा’ यांच्याशी व्यवस्थापन करार केल्याने ‘आयएचसीएल’चे गोव्यातील  आतिथ्य कंपनी हे स्थान अधिक बळकट होणार, असे ‘आयएचसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित चटवाल यांनी करारावर सह्या केल्यानंतर सांगितले.  

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

वीज बिले आता डेबिट, क्रेडीट कार्डद्वारे

१ ऑगस्टपासून सक्ती; वीजमंत्र्यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ; चेक, डीडीला फाटा Read more

Top News

मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका Read more

पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका Read more

चुकीच्या पद्धतीने कर आकारल्याचा कॅसिनो कंपन्यांचा दावा

जीएसटी मंडळासमोर कंपन्यांचे गाऱ्हाणे; पुढील बैठकीत अंतिम निर्णय Read more