कुडचडे येथे २, ३ मार्च रोजी कोकणी नाट्य संमेलन

कुडचडे येथे २, ३ मार्च रोजी कोकणी नाट्य संमेलन

12th February 2019, 06:03 Hrs


पणजी :
गोवा कोंकणी अकादमी, पणजी आणि कोकणी कला साहित्य केंद्र, कुडचडे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे कोकणी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन २ आणि ३ मार्च रोजी कुडचडे येथील रवींद्र भवनात होणार आहे.
संमेलनाच्या आयोजनासाठी विविध समिती नेमली असून जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनात, कोकणी नाटकाचा आजवरचा प्रवास दृष्टीक्षेप करणाऱ्या निवडक नाटकांच्या प्रवेशांचे सादरीकरण, परिसंवाद, परिचर्चा, नाटकाच्या पुस्तकांचे प्रदर्शन, शोभायात्रा, नाट्यक्षेत्रासाठी अतुल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचे सत्कार अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. कोकणी नाटकांशी संबंधित नाट्यसंस्था, नाट्य कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नाट्यकर्मी तसेच कोंकणी भाषेच्या विकासाशी संबंधित संस्था, लेखक, कलाकार यांनी मोठ्या संख्येने या संमेलनाचे प्रतिनिधी बनून संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.
आयोजकांच्या वतीने प्रतिनिधींची दोन दिवसांची भोजनाची व्यवस्था केली जाईल. तसेच ज्यांना गरज असेल त्यांच्या निवासाचीही व्यवस्था केली जाईल. मात्र त्यासाठी किमान आठ दिवस आधी सूचित करावे लागेल. प्रतिनिधी बनण्यासाठी नाममात्र रु.१०० फी ठेवलेली आहे. अधिक माहितीसाठी अथवा प्रतिनिधींच्या नावनोंदणीसाठी नाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष वसंत सावंत, मो. ९५१८९८३८४५, ९४२३०५८३१८, ईमेल vasantvant@gmail.com अथवा स्वागताध्यक्ष, डॉ. जयंती नायक मो., ९८२३५७५६२३, ८८३०२०९६१८ ईमेल-jaynaikamona @ gmail.com अथवा कोंकणी कला साहित्य केंद्राचे अध्यक्ष अशोक नायक मो. ९८५०९९८७७२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी जाहीर केलेले आहे.                                                                       

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

तेंडुलकरांनी खासदार निधीतून दिलेल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचा शुभारंभ

औद्योगिक वसाहतीसाठी वाहन उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत Read more

पणजी, म्हापसा, वास्को ओडीपींत २०० कोटींचा घोटाळा

आराखडे तात्काळ रद्द करून दोषींवर कारवाई करा : गिरीश चोडणकर Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more