सारस्वत, न्यू गोवा विद्यालय ‘बालोत्सव २०१९ चे संयुक्त विजेते

सारस्वत, न्यू गोवा विद्यालय ‘बालोत्सव २०१९ चे संयुक्त विजेते

12th February 2019, 06:02 Hrs


म्हापसा :
सारस्वत विद्यालय, म्हापसा येथील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी रोट्रॅक्ट क्लब ऑफ म्हापसातर्फे आयोजित केलेल्या बालोत्सव २०१९ चे संयुक्त विजेतेपद पटकावले. सारस्वत विद्यालय, म्हापसा व न्यू गोवा हायस्कूल, म्हापसा यांना समान गुण मिळाल्याने ‘उत्कृष्ट शाळा २०१९’ हा किताब विभागून देण्यात आला.
फुगडी, नृत्य, पारंपारिक फॅशन शो, कविता वाचन या विभागातील स्पर्धांमध्ये सारस्वत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिले बक्षीस पटकावले. वेशभूषा स्पर्धेत दुसरे तर चित्रकला व कथाकथन विभागात त्याना तिसरे बक्षीस मिळाले. आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन मुलांनी नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यपक, पालक-शिक्षक संघ व परिसरातील लोकांनी मुलांचे कौतुक केले. रोट्रॅक्ट क्लब ऑफ म्हापसातर्फे उत्कृष्ट शाळा २०१९ सारस्वत विद्यालयास ट्रॉफी देण्यात आली. मुलांचे पालक तसेच शिक्षिका पूर्वा केळकर, अनघा आपटे व शोभा पाडगावकर यानी मुलांना विशेष मार्गदर्शन केले.             

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more