वारखंड सरपंचपदी पल्लवी परब बिनविरोध

वारखंड सरपंचपदी पल्लवी परब बिनविरोध

12th February 2019, 06:01 Hrs

वार्ताहर । गाेवन वार्ता
धारगळ :
पेडणे तालुक्यातील वारखंड -नागझर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पल्लवी प्रसाद परब यांची बिनविरोध निवड झाली.
सोमवारी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी पंच संतोष मावळणकर, मंदार परब, स्मिता बांदेकर, प्रदीप पाडलोसकर, संजय तुळसकर आणि प्रदीप कांबळी उपस्थित होते.
सरपंच प्रदीप कांबळी यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त होते. मंदार परब यांनी पल्लवी परब यांच्या नावाची सूचना केली. त्याला प्रदीप कांबळी यांनी अनुमोदन दिले. निवडणूक अधिकारी म्हणून पेडणे गटविकास कार्यालयातील विस्तार अधिकारी चंद्रहास देसाई यांनी काम पाहिले. त्यांना पंचायत सचिव मुकुंद उक्षेकर यांनी सहकार्य केले. सरपंच पल्लवी परब यांचे उपस्थित पंचांनी अभिनंदन केले.

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

तेंडुलकरांनी खासदार निधीतून दिलेल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचा शुभारंभ

औद्योगिक वसाहतीसाठी वाहन उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत Read more

पणजी, म्हापसा, वास्को ओडीपींत २०० कोटींचा घोटाळा

आराखडे तात्काळ रद्द करून दोषींवर कारवाई करा : गिरीश चोडणकर Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more