पणजीत १० रोजी ‘सिटी ऑन सायकल’

- फोंमेंतो मीडियाच्या पुढाकाराने आयोजन; सायकलपटूंसाठी दोन विशेष योजना

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st February 2019, 03:18 pm
पणजीत १० रोजी ‘सिटी ऑन सायकल’

पणजी : फोंमेंतो मीडियाच्या पुढाकाराने पणजीत रविवार दि. १० फेब्रुवारी रोजी एचडीएफसी बँक ‘सिटी ऑन सायकल-२०१९’ या वारसास्थळ सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाऱ्या या अनोख्या फेरीची सुरूवात गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कांपाल येथील मैदानावरून होणार आहे. राज्यभरातील तसेच परराज्यातील हौशी सायकलपटू या फेरीत सहभागी होणार आहेत.
या खास सायकल फेरीत सहभागी होणाऱ्यांसाठी दोन विशेष योजना सादर करण्यात आल्या आहेत. पहिल्या योजनेत ५०० रुपये शुल्क देऊन नोंदणी करणाऱ्या सायकलपटूला ब्रँडेड टी-शर्ट, सिपर, पदक, प्रशस्तीपत्र व रिफ्रेशमेंट दिले जाणार आहेत. दुसरी योजना ही खास विद्यार्थ्यांसाठी असून, त्यात २०० रुपये शुल्क भरून सहभागी होणाऱ्यांना पदक, प्रशस्तीपत्र व रिफ्रेशमेंट दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ८९७५२२३९००/ ९५८८६२२९४२/ ९१५८८५१७३१/ ९९२२६९१५०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी गोवा राज्य विज्ञान व तंत्रज्ञान मंडळ, डेक्कन केमिकल्स, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच अधिकृत फूड डिलिव्हरी पार्टनर स्विगी यांच्या सहयोगासह ट्रिक, स्नेडन शॉन डान्स अॅकॅडमी, डान्स टू फिटनेस, रिच्युअल्स बँड, कारासिड, सेंट एन्स इव्हेंट्स, गोवा क्रीडा प्राधिकरण कांपाल, पणजी महानगरपालिका व गोवा पोलिसांचे सहकार्य लाभले आहे. फिल्मी ड्रॅगन या उपक्रमाचे क्रिएटिव्ह पार्टनर आहेत. 

हेही वाचा