बालसंगोपन आणि कथा-गोष्टीचं महत्त्व

पौराणिक एेतिहासिक घटना अाणि अापल्या अायुष्यात घडणाऱ्या घटना मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची अाहे. याची जाणीव पालकांनी ठेवली पाहिजे.

Story: ज्ञान सरिता | प्रा. सुरेंद्र वसंत सिरस� |
22nd January 2019, 05:35 am

छोट्या मुलांना खेळणी, अंगाईगीते, गाणी ज्याप्रमाणे भावतात त्याप्रमाणेच मुलं थोडीशी रांगू लागली, बोलू-चालू लागली की त्यांना छोट्या-मोठ्या गोष्टी एेकण्याने अानंद मिळतो, प्राणी, पक्षी, पऱ्या, राक्षस, भुते, राजा, राणी, राजपुत्र, शूर योध्दे, देव-देवता यांच्या गोष्टी, कथा, कविता एेकणे अावडते. जोपर्यंत मुलांना अक्षर अोळख होत नाही, वाचता येत नाही तोपर्यंत पालकांनाच ‘गोष्टी’च्या या जगात घेऊन जाण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. रात्रीच्यावेळी मुलं झोपत नसतील, जेवण करण्यास कंटाळा करीत असतील तर अशावेळी अाईने त्यांना एखादी गोष्ट सांगून मुलांचं मन रमवलं तर मुलं चांगलं जेवणही करतात अाणि शांतपणे झोपतातही!
गोष्टी एेकताना मुलांची करमणूक व मनोरंजन तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांच्या बौद्धिक, वैचारिक, भावनिक विचारसरणीला अधिक चालना मिळते. त्यांच्या श्रृति-क्षमतेमध्ये अाणि अाकलन-शक्ती-मध्ये त्यामुळे अधिक वाढ होते. नवीन शब्द, नव्या संकल्पना, विविध व्यक्ती यांची अोळख होते. फक्त पालकांनी योग्य अाणि उचित घटना व विषय असलेल्या गोष्टींची निवड करणे गरजेचे अाहे.
जस-जसे पाल्याचे वय वाढत जाते, तस-तसे गोष्टींच्या माध्यमातून त्यांना बाहेरच्या जगात घडणाऱ्या घटना, घडा-मोडी, सभोवतालचा परिसर यांचे ज्ञान मिळते अाणि वास्तवातलं जग अाणि काल्पनिक जग यातील फरकही समजून येतो. पौराणिक एेतिहासिक घटना अाणि अापल्या अायुष्यात घडणाऱ्या घटना मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची अाहे. याची जाणीव पालकांनी ठेवली पाहिजे.
मुलांना कोणतीही कथा, गोष्ट किंवा घटना एेकायला अावडते. परंतु कोणती गोष्ट किंवा कथा कोणत्या वयाच्या मुलांना अाणि कधी सांगावी याबाबतीत पालकांनी खूपच सजग जागरुक अाणि सावध राहिले पाहिजे. गोष्टी-कथांच्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून अाणण्याचे कार्य त्यांच्या पालकांनी अाणि प्रामुख्याने मुलांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या मातेने करावयास हवे!
अशावेळी अाठवते ती महाराष्ट्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई! महाभारत, रामायण, प्राचिन भारताच्या इतिहासातील वीर, शूर अाणि देशभक्तांच्या कथा अाणि गाथा ती अापल्या सुपुत्रास सांगत असे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अापण वाचतो किंवा एेकतो तेव्हा मराठीशाहीचा देदिप्यमान इतिहास ‘जिजाऊ’ च्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. याची जाणीव होते. महाराजांच्या गौरवशाली व्यक्तिमत्त्वात त्यांचे फार मोठे योगदान होते, याचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो!
त्याशिवाय स्वातंत्र्यासाठी इंग्रजी सत्तेशी झुंज देणाऱ्या राणा प्रताप, झांशीची राणी, राणी अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यासारख्या महनीय हुतात्म्यांचे कार्य मुलांसाठी प्रेरणादायी ठरू शकते, हेही पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात अापल्या देशात बुवाबाजीचे पेव फुटल्याचे अापण पाहतो अाहोत. हाताच्या बोटावर मोजण्याईतके काही साधू-संत वगळतां बुवाबाजी करणारे, बाया-मुलींवर अत्याचार करणारे ढोंगी भोंदूही समाजात अाहेत. याची जाणीवही मुलांना करून देऊ व अशा लोकांपासून दूर राहण्यास त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. त्याचबरोबर सर्वसामान्य व गरीब जनतेच्या कल्याणासाठी वावरणाऱ्या, अारोग्यसुविधा निर्माण करून दीन-दुबळयांची काळजी घेणाऱ्या महान साधू-संतांची अोळखही मुलांना करून दिली पाहिजे.
अनेकदा पालक अापल्याच धर्मातील शूर-वीरांच्या गोष्टी मुलांना सांगताना दिसतात. त्यामुळे मुलांमध्ये इतर धर्मातील लोकांना कमी लेखण्याची वृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. अापल्या भारत देशाने सर्व धर्म सममभावाची संकल्पना अापल्या घटनेत सामाविष्ट केलेली असताना सर्वच धर्मातील सददृदयता, शौर्य, धाडस, देशाभिमान, सचोटी नीतीमुल्ये यांच्या गाथा सांगणाऱ्या येशू ख्रिस्त, पैंगंबर, बुध्द, महावीर, झरतुष्ट, बसवेश्वर यांच्या कथा-गोष्टीही मुलांना सांगितल्या पाहिजेत जेणेकरून मुलांमध्ये सर्वच धर्मियांबद्दल बंधूभाव निर्माण होईल.
अाज अापला देश, भाषावाद, प्रांतावाद, दहशतवाद, विघटनवाद यांसारख्या वादामध्ये गुरफटला जात असताना सर्वधर्म समभावाची व एकात्मतेची गरज कथा-गोष्टींतून मुलांच्या मनावर बिंबवण्याची काळाची गरज अाहे, असं मला प्रामाणिकपणे वाटते!
प्रत्येक देश त्या देशातील भाषा बालवाङमयाने समृध्द असते. अापल्या भारत देशातही विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यात बोलीभाषांचाही समावेश अाहे. मातृभाषेतील पुस्तके वाचण्याची सवय झाली की, इंग्रजी, हिंदी किंवा इतर कोणत्याही अवगत असलेल्या भारतीय किंवा परकीय भाषेंतील पुस्तकांचे वाचन करण्यास पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. शैक्षणिक अभ्यासक्रम, अायुष्यक्रम, कारकीर्द, व्यवसाय याबाबत निश्चित दिशा दाखवण्याचे कार्यही कथा किंवा गोष्टीद्वारे होऊ शकते. विज्ञान, संशोधन, व्यवस्थापन, उद्योग, कला या क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्वांच्या जीवनगाथा सांगणारी चरित्रे अाणि कथा व त्यांचे कार्य परिणामकारकरित्या मुलांना मार्गदर्शक ठरू शकतात हे ही पालकांनी ध्यानात घेतले पाहिजे.
गोष्टींचा विषय अाणि अाशय हा निरनिराळया प्रकारचा असू शकतो. पौराणिक, एेतिहासिक, धार्मिक, काल्पनिक, करूण, विनोदी, शौर्यपूर्ण अशा गोष्टी मुलांच्या बौध्दिक विकासाला चालना तर देतातच शिवाय त्यांच्या विचारांना गतीही प्राप्त करून देतात. अनेकदा मुलं झोपत नसतील, तर त्यांच्या मनात भीती घालून पालक त्यांना झोपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना राक्षस, भुते, बगुलबुवा, असूर यांच्या भयप्रद गोष्टी सांगून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात व भयाने त्यांनी झोपावे म्हणून प्रयत्न करतात. मुले उपजतच मनाने कमकुवत व भित्री असतात. त्यामुळे त्यांच्या मनात अशा भयप्रद गोष्टी एकून भयगंड निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी मुलांना गाढ झोप लागत नाही. झोपेत दचकून उठतात, रडतात, किंचाळतात. या वर्तन दोषांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला बाधा अाणण्याची शक्यता असते. म्हणून पालकांनी मुलांना गोष्टी सांगताना ती अानंदी अाणि उत्साही राहतील याची दक्षता घेणेही अावश्यक अाहे.
मानसशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी जे संभाषण, जे विचार, ज्या घटना अापल्या कानावर पडतात किंवा मनात घोळत असतात तशी स्वप्ने मुलांना झोपेत पडतात. त्यामुळे त्यांना भीतीप्रद गोष्टी किंवा घटना न सांगता सद्विचार, अानंद देणारे, मन शांत ठेवणारे असे विचार व संभाषण त्यांना ऐकवले तर त्यांचा इष्ट परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. एखाद्या गोष्टींविषयी मुलांच्या मनात भयगंड निर्माण झाला तर तो दूर करणे अतिशय कठिण असते. म्हणूनच रंजक, उद्बोधक अशा गोष्टी व घटना मुलांना कथन केल्या तर मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर त्याचा इष्ट परिणाम होत असतो. हे ही पालकांनी ध्यानात घेणे गरजेचे अाहे.
कथा-गोष्टी यांचे जग खूप विस्तृत अाणि व्यापक अाहे. या जगात मुक्तपणे विहार करणारी मुले, योग्य त्या मार्गाने अापल्या यशस्वी अाणि उज्वल भवितव्याच्या दिशेने वाटचाल करतील याबद्दल पालकांच्या मनात शंका असण्याचं कारण नाही.
अाज जागतीक स्तरावर नवनवीन शोध लावले जात अाहेत. विज्ञान अाणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग बरेच पुढे गेले अाहे. त्यामुळे कथा-गोष्टींच्या पुस्तकांच्या निर्मितीमध्येही मुलांना वाचनासाठी अाकर्षित करू शकणारे अनेक प्रयोग केले जात अाहेत. पुस्तकांचे अाकार, छपाई यामध्ये नाविन्य अाणि अाकर्षकता अाणण्याचे प्रयत्न केले जात अाहेत. वृक्ष, प्राणी, पक्षी, वाहने, घर यांच्या अाकारांत पुस्तके प्रसिध्द केली जातात. हल्ली-हल्ली संगीतबध्द केलेली पुस्तकेही बाजारपेठेत उपलब्ध अाहेत. पुस्तकातील उलगडलेल्या प्रत्येक पानाबरोबर मधूर पार्श्वसंगीत एेकायला मिळते. मुलांच्या वयोमानानुसार पुस्तकामध्ये अावश्यक तेथे विविध प्रकारची अक्षरे, चित्रे, रंगसंगती याचा योग्य तो मेळ घालून ती वाचनीय केली जात अाहेत. अापल्या अार्थिक कुवतीनुसार पालकांनी मुलांना अशी पुस्तके खरेदी करून दिल्यास मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होऊ शकेल. याशिवाय दूरचित्रवाणीवर प्राणी, पक्षी, वृक्ष यावर अाधारित खास मुलांसाठी गोष्टीरुप मालिका दाखवल्या जातात. त्या अापल्या मुलांना दाखवण्यात काहीही गैर नाही.
अापल्या वाड्यावरील किंवा चाळीतील मुलांचा गट करून कथा-कथनासारख्या कार्यक्रमांतून त्यांना गोष्टींच्या साम्राज्यात नेणे पालकांना शक्य अाहे. कथनाच्या स्पर्धांमधून सहभागी होण्यास मुलांना प्रवृत्त केल्यास अापल्या समोर बसलेल्या जमावाबद्दलची भीती तर मनातून जातेच, शिवाय अावाज, बोलण्याची शैली, शरीराच्या हालचाली, शब्दोच्चार यामध्येही सुधारणा घडून येते. याशिवाय गोष्टी वाचण्याची सवय मुलांना व्हावी म्हणून वाड्यावर किंवा चाळीत मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन वाचनालयासारखे उपक्रम सुरु केल्यास त्याचाही फायदा मुलांना होऊ शकतो. ग्रामीण भागातील मुलांसाठी काही राज्यात शासनातर्फे फिरती वाचनालये उपक्रम सुरु करण्यात अाला अाहे. ग्रामपंचायती किंवा नगरपालिका यांसारख्या स्वराज्या संस्थातर्फे ही वाचनालये सुरु करण्यात येत असून त्याचा फायदाही पालक अापल्या मुलांना करून देऊ शकतील.