फेडरर पराभूत, नदालची आगेकूच


20th January 2019, 04:40 pm
फेडरर पराभूत, नदालची आगेकूच

फेडरर मावळला, नदालची जादू कायम
मेलबर्न :
स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार व २० वेळचा ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररे सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकण्याचे स्वप्न उध्वस्थ झाले. रविवारी जागतिक क्रमवारीती तिसऱ्या स्थानावरील खेळाडू फेडररला २० वर्षीय स्टेफनास सिसिपासने ६-७, ७-६, ७-५, ७-६ने पराभूत करत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.
या टुर्नामेंटच्या आधी ग्रीसमध्ये जन्माला आलेल्या व सध्या सायप्रस यादेशात राहणाऱ्या सिसिपास फिलहालने विम्बल्डनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते मात्र याआधी तो एकाही ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला नव्हता. फेडररने येथे अखेरचा पराभव २०१६ साली पाहिला होता. त्यावेळी नाेवाक जोको​विचने त्याला उपांत्य फेरीत नमवले होते.
फेडरर ऑस्ट्रेलियन ओपन किताब विक्रमी सातव्यांदा जिंकण्याच्या इराद्याने उतरला होता. फेडरर, नोवाक जोकोविच व राय एमरसन यांनी ऑस्ट्रेलियन ओपन प्रत्येकी सहा वेळा जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान टेनिस खेळाडू एमरसननें ओपन एरामध्ये हा विक्रम कीर्तिमान रचला होता.
एखाद्या ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा सिसिपास पहिला युनानी खेळाडू बनला आहे. तो अंतिम ८मध्ये १४वे मानांकन प्राप्त राबर्टो बतिसनता आगुटशी लढणार आहे. त्याने सहावे मानांकन प्राप्त मारिन चिलिचचा पराभव केला.
राफेल नदालची आगेकूच
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू राफेल नदालने वर्षातील पहिला ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले शानदार प्रदर्शन कायम राखले आहे. राफेलने रविवारी मेलबर्नमध्ये दमदार प्रदर्शन करताना चेक गणराज्यच्या थॉमस बर्डिचचा ६-०, ६-१, ७-६ने पराभव केला. हा सामना दोन तास पाच मिनिटांपर्यंत चालला होता. त्याने ११व्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
१७ वेळचा ग्रँड स्लॅम विजेता नदालने आपली ताकद व चपळता यांचा वापर करत शानदार सुरुवात केली व प्रतिसनपर्धी खेळाडूला पहिल्या सेटमध्ये एकही गेम जिंकण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्येही नदालने आपल्या खेळाचा स्तर उंचावून ठेवला. बर्डिचने दुसऱ्या सेटमध्ये केवळ एकच गुण मिळवला.
तिसऱ्या सेटमध्ये प्रेक्षकांना थोडाफार संघर्षपूर्ण सामना पाहण्यास मिळाला. बर्डिचने नदालला थोडे अडचणीत टाकले व तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत नेला, मात्र अंतिम क्षणात त्याने चुका केल्या व यामुळे नदालने ७-४ने सामना जिंकला.