न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल


20th January 2019, 04:39 pm
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल

ऑकलंड :भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय व तीन टी-२० सामने खेळणार आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकल्यानंतर प्रथमच एकदिवसीय मालिकेवरही आपले नाव कोरले. भारत या विजयी घेडदौडीला न्यूझीलंडमध्येही कायम राखण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी नुकताच श्रीलंकेचा ३-०ने पराभव केला आहे. आता कोहली आणि कंपनी न्यूझीलंडच्या संघाचा सामना कसा करणार हे पहावे लागले.
भारतीय संघाचे वेळापत्रक
दिनांक एकदिवसीय स्थळ वेळ
२३ जानेवारी पहिला नेपियर सकाळी ७.३० वा.
२६ जानेवारी दुसरा माउंट मंगनुई सकाळी ७.३० वा.
२८ जानेवारी तिसरा माउंट मंगनुई सकाळी ७.३० वा.
३१ जानेवारी चौथा हॅमिल्टन सकाळी ७.३० वा.
३ फेब्रुवारी पाचवा वेलिंगटन सकाळी ७.३० वा.
दिनांक टी-२० स्थळ वेळ
६ फेब्रुवारी पहिला वेलिंगटन दुपारी १२.३० वा.
८ फेब्रुवारी दुसरा ऑकलंड सकाळी ११.३० वा.
१० फेब्रुवारी तिसरा हॅमिल्टन दुपारी १२.३० वा.
भारतीय एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, महम्मद सिराज, खलील अहमद, महम्मद शमी, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), विजय शंकर.
टी-२० साठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, शुभमन गिल, विजय शंकर, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक)