राज्यात पेट्रोल १ रुपयाने वाढले

Story: विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता |
15th January 2019, 11:17 am
राज्यात पेट्रोल १ रुपयाने वाढले

पणजी: राज्यात पेट्रोलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. सरकारने आज पेट्रोल वरील व्हॅट १३ टक्क्यांवरून १५ टक्के केला आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल वरील व्हॅट १७ वरून १३ टक्क्यांवर आणला होता. दरम्यान, हवाई जहाजाच्या इंधनात किंचित वाढ झाली आहे.

गेले काही दिवस डिझेलचे दर प्रचंड वाढले होते जे पेट्रोलपेक्षा जास्त होते. गोव्यात पेट्रोल ६२.८७ रुपये तर डिझेल ६३.५८ रुपये एवढे प्रती लीटर आहे. आता पेट्रोलच्या दरात किमान १ रुपयाच्या आसपास वाढ होणार आहे. गोव्यात पेट्रोल ६३.९९ रुपये एवढे होईल.

पेट्रोलवर २ टक्के व्हॅट वाढवूनही कर्नाटक व महाराष्ट्रापेक्षा गोव्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त असेल. कारवारमध्ये ७३.७२ रुपये लीटर पेट्रोल तर ६७.५६ रुपये डिझेलचे दर आहेत. सावंतवाडीत पेट्रोल ७६.९३ रुपये तर डिझेल ६७.५२ रुपये आहे.

ऑक्टोबर महिन्यात जेव्हा पेट्रोल व डिझेलचे दर वाढले होते त्यावेळी गोव्यात ४ टक्के व्हॅट कपात करून पेट्रोल व डिझेल स्वस्त करण्यात आले होते. 

हेही वाचा