‘सरकारी लाभार्थीं’चा गृह आधार बंद

मूल असलेल्या विधवा महिलेला दोन योजनांचा लाभ मिळेल, सरकारचा निर्णय

13th January 2019, 06:18 Hrs

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारी सेवेत कायम असलेल्या, सरकारी महामंडळ किंवा सरकारी संस्थेत, केंद्र सरकारच्या कायम सेवेत असलेल्या किंवा शेड्युल बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींना गृह आधार योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी दुरुस्ती सरकारने योजनेत केली आहे. मात्र, हल्लीच झालेल्या सर्वेक्षणातून हजारो सधन लोकांच्या पत्नींनाही गृह आधार योजनेचा लाभ मिळत आहे, असे उघड झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गृह आधार योजनेच्या परिणाम मूल्यमापन सर्व्हेत गृह आधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे साडेसहा हजार लाभार्थ्यांनी माघार घेण्यासाठी अर्ज केला आहे. गृह आधार योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला असून, सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर कार्यवाही करताना पंधरा हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.
सरकारी नोकरीत, चांगल्या बँकांमध्ये कायम असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीनांही गृह आधार योजनेचा लाभ मिळत असल्याची माहिती सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. सात तालुक्यांत पूर्ण झालेल्या सर्व्हेत सुमारे साडेतेरा हजार लाभार्थी गाळण्यात येतील अशी स्थिती आहे. याच सर्व्हेत पतीला दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो आणि पत्नीला गृह आधारचा लाभ मिळतो, असेही दिसून आले आहे. अनेक सधन कुटुंबांत ही स्थिती आहे. त्यामुळे एका दाम्पत्याला एकाच योजनेचा लाभ मिळावा, असाही गृह आधार योजनेच्या दुरुस्तीमागचा उद्देश आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
महिला व बाल कल्याण खात्याने केलेल्या कायदा दुरुस्तीनुसार अल्पवयीन मूल असलेल्या ज्या विधवा महिलेला दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो त्या महिलेला गृह आधारचाही लाभ घेण्याची मुभा असेल असे म्हटले आहे. खात्याने नवी सुधारित गृह आधार योजना अधिसूचित केली असून, योजनेत मोठे बदल केले आहेत. योजनेच्या लाभार्थ्यांचा एकूण आकडा हा १.५२ लाख एवढाच ठेवला आहे. इतर बहुतांश अटी तशाच ठेवल्या आहेत, परंतु यापुढे येणारे अर्ज हे चांगली छाननी करूनच व अर्जदार महिलेचा पती हा सरकारी नोकरदार किंवा शेड्युल बँकेचा कर्मचारी आहे किंवा नाही याची खात्री करूनच निकालात काढले जातील. सहकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी, तसेच कंत्राटी व रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींना मात्र यात सूट आहे.
-......पॉईंटर-
...यांना गृह आधार योजनेचा लाभ मिळणार नाही
- राज्य सरकार, महामंडळ व सरकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी.
- केंद्र सरकार किंवा केंद्रीय संस्थेच्या कर्मचाऱ्याची पत्नी.
- शेड्युल्ड बँकेच्या कर्मचाऱ्याची पत्नी.
- दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीची पत्नी.
-चौकट....०-
सुधारित गृह आधार योजनेत मोठे बदल
- एका दाम्पत्याला एकाच योजनेचा लाभ मिळावा, असा गृह आधार योजनेच्या दुरुस्तीमागचा उद्देश.
- या योजनेसाठी यापुढे येणारे अर्ज हे छाननी करूनच व अर्जदार महिलेचा पती हा सरकारी नोकरदार किंवा शेड्युल बँकेचा कर्मचारी आहे किंवा नाही याची खात्री करूनच निकालात काढले जाणार.
- सहकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी, तसेच कंत्राटी व रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींना सूट. 

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more